Nandurbar Agriculture News : आयान कारखान्याने मागील हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन दोन हजार ३५० रुपये याप्रमाणे एकरकमी सरसकट चालू हंगामात वेळेत अदा केलेला आहे.
ऊसदराचा दुसरा हप्ता सरसकट १०० रुपये प्रतिटन याप्रमाणे दिवाळीपूर्वी १० कोटी ६१ लाख अदा करण्याचा निर्णय घेतला असून, ही दर हा निघत असलेल्या एफआरपीपेक्षा ८५ रुपये प्रतिटन जास्त आहे. (Ayan factory will pay 10 crore 61 lakh before Diwali to sugarcane farmer nandurbar agriculture news)
भागातील इतर कारखान्यांपेक्षा १०० ते १२५ रुपयांनी जास्त आहे. यामुळे आयान शुगरचा अंतिम ऊसदर दोन हजार ४५० रुपये प्रतिटन मिळणार आहे, अशी माहिती संचालक सचिन एस. सिनगारे यांनी दिली.
शेकडो हातांना रोजगार
नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात कारखान्याने मागील १२ वर्षांतील गाळपाचे सर्व रेकॉर्ड मोडून कमी दिवसांत नोंद-बिगरनोंद उसाचे जास्तीत जास्त गाळप करून नवनवीन विक्रम करत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त ऊस असताना संपूर्ण उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना शासनाकडून २०० रुपये सबसिडी येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अदा केलेली होती.
ऊस विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड केलेली मदत यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील समृद्धीची दालने खुली केली आहेतच त्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि त्यावर आधारित शेकडो व्यावसायिकांच्या हाताला रोजगारही दिला आहे. त्यांना जगण्याचे बळ दिले आहे.
कारखान्याने उसाच्या व्हरायटीत बदल केला असून, उसासाठी लागणारे चांगल्या प्रतीचे बियाणे, प्रेसमड उधारीने उपलब्ध करून दिले आहे. सुधारित जातीचे ऊस बियाणे पट्टा पद्धतीने लागवड करणे व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे यासाठी शेतकऱ्यांना गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वेळेत पेमेंट देणार ः सिनगारे
आगामी गाळप हंगाम २०२३-२४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी ऊस नोंदी, ऊसतोडणी, वाहतूक व हार्वेस्टर यंत्रणा सज्ज आहे. कारखान्याच्या अत्याधुनिक गाळपक्षमतेमुळे दररोज दहा हजार टनांचे गाळप होणार असून, या वर्षी ऊस क्षेत्रात घट झाल्यामुळे सीमाभागातील, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील इतर कारखान्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. अपेक्षेप्रमाणे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत.
जास्तीत जास्त गाळप करणार असून, कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून उसाचे गाळप करण्यासाठी संगणकीकृत अचूक ऊस वजनकाटा, ऊसतोडणीत पारदर्शकता ठेवून प्रोग्रामप्रमाणे नोंद व बिगरनोंद संपूर्ण उसाचे गाळप करून चांगला ऊसदर व दर वर्षीप्रमाणे वेळेत पेमेंट देणार असल्याची माहिती संचालक सचिन एस. सिनगारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.