Dhule News : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम धुळे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ‘फिट धुळे-हेल्दी धुळे’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या मोहिमेत ‘आयुष्मान कार्ड’ व ‘आभा कार्ड’ लाभार्थ्यांना उपलब्ध करून देणे प्रमुख लक्ष्य आहे. या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
आयुष्मान भव मोहिमेच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात पत्रकार परिषद झाली. (Ayushman Bhava campaign will be implemented in Dhule district from September 17 dhule news)
जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी मोहिमेची माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक दत्ता देवगावकर, जिल्हा आरोग्याधिकारी सचिन बोडके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की आयुष्मान भव मोहिमेंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात तीन हजार ६८० आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहेत. पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार सेवा, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार, तिसऱ्या आठवड्यात माता, बालआरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी आदी सेवा मेळाव्याद्वारे उपलब्ध असतील.
याशिवाय १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यात स्वच्छता मोहीम, अवयवदानाविषयी जनजागृती तसेच रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. २ ऑक्टोबरला सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र व ग्रामसभा, आयुष्मान सभांचे आयोजनही करण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तसेच १८ वर्षांवरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी व निदान व उपचार करण्यात येईल.
आयुष्मान, आभा कार्ड
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत शासनाच्या अंगीकृत रुग्णालयात प्रतिकुटुंब प्रतिव्यक्ती पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ मोफत दिला जातो.यात एक हजार २०९ आजारांचा समावेश आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आयुष्मान आपल्या दारी-३.० मोहिमेत आयुष्मान ॲपचा वापर करून आशा, एएनएम घरोघरी जाऊन ग्रामपंचायतीच्या मदतीने पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड/ई-केवायसी काढून देतील.
आपले सेवा केंद्र, सीएससी व इतर केंद्रांतून लाभार्थी मोफत कार्ड काढू शकतात. ॲपच्या माध्यमातून स्वतः लाभार्थी कार्ड काढू शकतात. तसेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा कार्ड) जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काढण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील स्थिती आयुष्मान कार्ड
एकूण लाभार्थी...९,३९,३३८
कार्डवाटप...३,२५,५६५ (३५ टक्के)
आभा कार्ड
एकूण नागरिक...१८.५ लाख
कार्ड वाटप...४.५ लाख
मुख्यालयी राहण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य केंद्रांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत, यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आ,हे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांतून जिल्हा रुग्णालयाकडे रुग्ण पाठविण्याचा प्रकार वाढल्याच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी गोयल यांनी याबाबत आम्ही मॉनिटरिंग करत असून, आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.