Dhule News : धुळे जिल्ह्यात 17 पासून ‘आयुष्मान भव’ पंधरवडा

Health Department
Health Departmentesakal
Updated on

Dhule News : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘आयुष्मान भव’ सेवा पंधरवडा राबविण्यात येईल.

‘आयुष्मान आपल्या दारी’अंतर्गत गावपातळीवर गृहभेटी देऊन आरोग्य सेवकामार्फत पात्र लाभार्थ्याचे आयुष्मान कार्ड नोंदणी, आभा कार्ड नोंदणी व वितरण करण्यात येईल. २ ऑक्टोबरला ग्रामसभेत आरोग्यविषयक माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Ayushman Bhava fortnight in Dhule district from 17 september dhule news)

आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला करण्यात येणार आहे. मेळाव्याच्या पहिल्या आठवड्यात स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार तपासणी, निदान व उपचार करण्यात येईल.

दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बालआरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Health Department
Dhule News : तत्कालीन आयुक्तांच्या मंजुरीने कार्यवाही; विद्यमान आयुक्तांना अंधारात ठेवून विषय महासभेत

या कालावधीत स्वयंसेवी संस्थांमार्फत रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात येणार आहे.

आरोग्य संस्था, ग्रामसभा, शाळा, महाविद्यालयात अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आरोग्य संस्था, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

Health Department
Dhule News : कचरा फेकल्यास, कॅरिबॅग वापरल्यास दंड : उपायुक्त डॉ. नांदूरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()