Ayushman Card : धुळे महापालिकेतर्फे आयुष्यमान कार्ड; 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पंतप्रधान जन आरोग्य योजना आयुष्यमान कार्ड बनविण्यात येत आहे.
Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Cardesakal
Updated on

Ayushman Card : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पंतप्रधान जन आरोग्य योजना आयुष्यमान कार्ड बनविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना सरकारी व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे. त्यासाठी आयुष्यमान कार्ड (गोल्डन कार्ड) असणे बंधनकारक आहे.(Ayushman Card by Dhule Municipal Corporation dhule news)

कार्ड बनवून घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रभातनगर देवपूर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र राऊळवाडी - शाळा क्र. २८ चितोडनाका, चितोड रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हजारखोली उर्दू हायस्कूलजवळ, १०० फुटी रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नंदीरोड, शाळा क्र. ५१/५२ तिरंगा चौक, ८० फुटी रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कृष्णनगर साक्रीरोड, मोगलाई यासह शहरातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र वलवाडी, अवधान, चितोड, चक्करबर्डी, वीटभट्टी, लाला सरदार, कबीरगंज, पिप्री, मच्छीबाजार आदी ठिकाणी संपर्क साधावा.

Ayushman Bharat Card
Ayushman Bharat Card : डॉक्टर, कर्मचारी, नागरिकांनो ‘आभा’ कार्ड बनवा! : महापालिका आरोग्य विभाग

योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. एम. आर. शेख, आरसीएच अधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी, नोडल अधिकारी डॉ. प्रशांत मराठे यांनी केले.

Ayushman Bharat Card
Ayushman Card : आयुष्मान कार्ड मोहिमेत मराठवाडा विभागात नांदेड अव्‍वल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.