Dhule Lumpy Disease : 5 किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित; जिल्ह्यातील गावांमध्ये जनावरे खरेदी-विक्रीस बंदी

Lumpy Disease
Lumpy Disease esakal
Updated on

Dhule Lumpy Disease : अजनाळे, बोरविहीर, फागणे (ता. धुळे), मालपूर, धावडे (ता. शिंदखेडा), सुकवद, अहिल्यापूर, थाळनेर, विखरण खुर्द (ता. शिरपूर) व सुकापूर, जैताणे, कुत्तारमारे, कढरे (ता. साक्री) येथील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसिज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे.

या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होऊ नये यासाठी तरतुदीनुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करीत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी दिला. (Ban on sale and purchase of animals in villages of district dhule lumpy news)

लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त गावांपासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित क्षेत्र परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॅाक्स लशीची मात्रा देऊन शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे.

निरोगी जनावरे वेगळी बांधावीत. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात आणू नयेत. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चराईसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. गायी व म्हशींना पशुपालकांनी स्वतंत्र ठेवावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lumpy Disease
Dhule Lumpy Disease : ‘लम्पी’ केंद्रापासून 5 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र घोषित : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. रोगप्रसारास कारणीभूत डास, माश्या, गोचीड आदी कीटकांना नियंत्रणासह गोठ्यात जंतुनाशकाची फवारणी करावी. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह आठ फूट खोल खड्ड्यात पुरून मृतदेहाच्या खाली-वर चुन्याची पावडर टाकावी. पशुवैद्यकीय प्रमुखांनी नियंत्रणासाठी भेटी द्याव्यात.

लम्पी स्किन रोगाचा विषाणू वीर्यामधून प्रसार होत असल्यामुळे वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्यसंकलन थांबविण्यात यावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे. तरतुदीचे उल्लंघन केल्यास दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे आदेशात नमूद आहे.

Lumpy Disease
Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद; लम्पीबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा घोषित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.