धुळे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे येथे अनोखे अभिवादनाचा कार्यक्रम झाला. आयुष्यभर डोक्यावरून मैल्याची टोपली वाहणाऱ्या मनपाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे फुले व पंचामृताने दुग्धाभिषेक करत ऋण फेडण्यात आले. तसेच गरीब कष्टकरी महिलांना साडीवाटप झाले. (bath of municipality employees working at drainage with Panchamrit on Balasaheb Thackeray Jayanti dhule news)
बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे शहरातील नदीकिनारी श्री महाकालीमाता मंदिरालगत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसह बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यात ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मनोज मोरे व संजय वाल्हे यांनी सपत्नीक मनपातील निवृत्त कर्मचारी अर्थात ज्येष्ठ महिला व पुरुषांचे फुले व पंचामृताच्या दुग्धभिषेकाने पाय धुऊन ऋण फेडण्यात आले.
डोक्यावर मैला वाहत शहराची स्वच्छ्ता करत नागरिकांचे आरोग्य जोपासण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेची उतराई होण्यासाठी हा अभिवादनाचा कार्यक्रम झाला.
पाचशे साड्यांचे वाटप
या अनपेक्षित उपक्रमामुळे भावनाविवश निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या. आजपर्यंत आमचा असा सत्कार झाला नाही, असे भावनिक उद्गार सत्कारमूर्तींनी काढले. शिंदे गटाला आशीर्वाद दिले.
बांधिलकीचे बाळकडू जोपासत सरासरी ५०० गरीब कष्टकरी महिलांना साडीचोळी देत त्यांचाही सत्कार केला. शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, मनोज मोरे, सतीश महाले, संजय वाल्हे, संजय गुजराथी, विजय अग्रवाल, समाधान शेलार, संजय गायकवाड, हनुमंत आवतडे, नीलेश काटे, शेखर बडगुजर, किरण पवार, सुनील सपकाळ, सनी मोरे, नीलेश मराठे, अजय जगदाळे, सुयोग मोरे, पापा शाह,
अस्लम खाटीक, बट्टा भाई, भटू भोपे, नंदू जगदाळे, पप्पू वाल्हे, अजय जगदाळे, गोकुळ सूर्यवंशी, राज यादव, प्रशांत माळी, ललित भावसार, आदित्य मोरे, समर्थ महाले, दर्शन ढवळे, प्रज्ज्वल बरडिया, भारती मोरे, मनीषा वाल्हे, सुरेखा मोरे, श्रीमती मराठे, संगीता बोरसे, सारिका पवार, रेखा मोरे, मयूरी सूर्यवंशी, सारिका पवार, पूजा वाल्हे, प्रिया चव्हाण आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.