शिरपूर (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४९ अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीत दाखल अर्जांची एकूण संख्या ६१ झाली आहे. ५ एप्रिलला निवडणूक अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. (Battle of Market Committee election started in Dhule district news
आमदार अमरिशभाई पटेल गटातर्फे १८ पैकी १५ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. व्यापारी मतदारसंघ व हमाल-मापाडी मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे त्याबाबत माघारीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या निवडणुकीत पटेल गटाविरोधात शेतकरी विकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले असून, त्यांच्या अधिकृत उमेदवारांची घोषणाही माघारीच्या तारखेनंतर केली जाणार आहे.
मतदारसंघनिहाय दाखल अर्जसंख्या अशी ः
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ : सर्वसाधारण गट : या गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल तथा के. डी. पाटील, बाजार समितीचे माजी संचालक मोहन पाटील व अॅड. गोपालसिंह राजपूत अशा प्रमुख उमेदवारांसह एकूण १९ जणांनी अर्ज दाखल केले.
महिला राखीव गट : या गटातून पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या पत्नी मेघा पाटील, माजी संचालक राजकपूर मराठे यांच्या पत्नी मनीषा मराठे यांच्यासह चार महिलांनी अर्ज दाखल केले.
इतर मागासवर्गीय गट : या गटातून ज्येष्ठ नगरसेवक मोहन हुलेसिंह पाटील यांचे पुत्र प्रसाद पाटील व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मनोहर भदाणे यांच्यासह तीन जणांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
अनुसूचित जमाती गट : या गटातून काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रणजितसिंह पावरा यांच्यासह पाच जणांनी अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत मतदारसंघ :
सर्वसाधारण गट : या गटातून शिरपूर साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मीकांत पाटील, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी यांच्यासह चार जणांनी अर्ज दाखल केले.
अनुसूचित जाती-जमाती गट : या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पाडवी, जोयद्याच्या सरपंच शीला पावरा यांच्यासह एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आर्थिक दुर्बल घटक गट : या गटातून हिंगोणीचे उपसरपंच मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते हेमराज राजपूत यांच्यासह पाच जणांनी अर्ज दाखल केले.
व्यापारी मतदारसंघ : या मतदारसंघातील दोन जागांसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, माजी संचालक मोहन पंडित पाटील व सतीश जैन यांच्यासह सहा उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले.
हमाल-मापाडी मतदारसंघ : या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पाच इच्छुकांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
साक्रीत १३३ अर्ज दाखल
साक्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी अखेरच्या दिवशी १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १९५ अर्जांची विक्री झाली होती. पैकी १३३ अर्ज दाखल झाले. त्यात अनेक दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, माघारीअंती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यात सर्वाधिक ४७ अर्ज हे सेवा सहकारी संस्था गटात सर्वसाधारण जागेसाठी दाखल झाले आहेत, तर याच गटात महिला राखीव गटासाठी अकरा, इतर मागासवर्गीय गटासाठी ११, तर अनुसूचित जमाती गटासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण जागेसाठी २५, अनुसूचित जाती/जमातीसाठी १४, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन अर्ज दाखल झाले. व्यापारी व अडते मतदारसंघात १३, तर हमाल व तोलारी गटात एकूण चार अर्ज दाखल झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गिते, सहाय्यक निर्णय अधिकारी विजय वडांगे, सहाय्यक म्हणून प्रकाश शिंपी, सुशील महाजन, व्यंकटराव सुर्वे, दीपक साळुंके, विनायक काळे, संजय पोतदार, मनोज थोरात आदी कामकाज पाहत आहेत.
दोंडाईचात २१५ अर्ज
दोंडाईचा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी २१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १८ जागांसाठी भाजप, महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये निवडणुक रंगणार आहे.
भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदारांचे मेळावे घेत कंबर कसली आहे. आमदार जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येथे, तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदखेडा येथे मेळावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.