Nandurbar News : तळोदा पालिका सभेआधी वातावरण तापले

Taloda: Mitalkumar Twale while Guiding the farmers in the meeting
Taloda: Mitalkumar Twale while Guiding the farmers in the meetingesakal
Updated on

तळोदा : शहराच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी माळी समाज मंगल कार्यालयात बैठक घेऊन विशेष सभेतील विकास आराखड्याचा विषयाला स्थगित करण्याची मागणी केली.

त्यामुळे पालिका सभेच्या एक दिवस अगोदर विकास आराखडा संदर्भात बैठकांचे सत्र सुरू असून आराखड्याबाबत शहरातील वातावरण तापले आहे. त्यात आजच्या पालिकेतील बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तळोदा शहराच्या सुधारित प्रारूप विकास आराखडा नगरपालिकेने तयार केला आहे. त्या आराखड्यात पुढील पन्नास वर्षांच्या लोकसंख्येच्या दृष्टीने विकास कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. (Before taloda Municipal Corporation Meeting disturbance Nandurbar news)

Taloda: Mitalkumar Twale while Guiding the farmers in the meeting
Jalgaon News : बोरी उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

असे असले तरी मागीलवेळी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यातील आरक्षण असलेल्या कोणत्याही भूभागावर नगरपालिकेने विकास काम केलेले नाही असा अनुभव गाठीशी असल्यामुळे सुधारित प्रारूप विकास आराखड्यात आरक्षित असलेले शेतजमीन तसेच ग्रीन झोन दाखविलेल्या शेत जमिनीच्या शेतकऱ्यांना प्रारूप विकास आराखड्याबाबत संभ्रम आहे.

त्यादृष्टीने संपूर्ण विकास आराखड्यालाच स्थगित करण्यात यावे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता.२३) होणाऱ्या विशेष सभेआधी विकास आराखड्यावर चर्चा करावी या दृष्टीने माळी समाज मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली.

बैठकीत विकास आराखड्याला स्थगित करण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली. बैठकीत हिरालाल कर्णकार, नथू माळी, दिलीप मगरे, डी. ओ. भोई, सुधाकर पिंपरे, योगेश पाटील, पंकज पाटील, मुकेश महाजन, जगन्नाथ माळी, प्रभाकर मगरे, सुधीरकुमार वाणी, तुषार मगरे, सतीश माळी, संजय माळी, शांतिलाल पिंपरे, लक्ष्मण माळी, मोहन माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Taloda: Mitalkumar Twale while Guiding the farmers in the meeting
Nandurbar News : आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

हरकतींच्या सुनावणीनंतर संभ्रम

आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल सव्वा तीनशे शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या होत्या. त्या हरकतींची सुनावणी देखील घेण्यात आली. मात्र हरकतींचे पुढे काय झाले अथवा हरकतींवर कोणता निर्णय घेण्यात आला, यासंदर्भात कोणताही कागदोपत्री व्यवहार नगरपालिकेने केला नाही. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संभ्रम असून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बैठकीचे सत्र आरंभिले असून नगरसेवकांना देखील रात्री घेण्यात आलेल्या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे विकास आराखड्यावर शेतकऱ्यांनी नगरसेवकांवर दबाव निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे.

"विकास आराखड्यावर हरकती घेतल्यानंतर सुनावणी घेण्यात आली. मात्र नगरपालिकेने हरकतींचे पुढे काय झाले. हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आराखड्यास एकजुटीने विरोध कायम आहे."

मितलकुमार टवाळे, शेतकरी, तळोदा

Taloda: Mitalkumar Twale while Guiding the farmers in the meeting
Nandurbar News : 14 वर्षीय हृदयाने घोडेस्वारी करत गाठले सारंगखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.