Dhule NCP News: राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी भावसार! अजित पवार यांच्याकडून धुळ्यात नियुक्तीच्या हालचाली

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Dhule NCP News : राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पक्ष संघटना उभी करण्याचे काम राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सुरू केले आहे. धुळे जिल्ह्यात बहुतांश नेते हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळते आहे.

परिणामी अजित पवार गटाकडून धुळे शहरात नवीन आश्वासक चेहऱ्याचा शोध सुरू असून, सारांश भावसार यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्षपदाची माळ पडू शकते. (Bhavsar city president of NCP Appointment moves by Ajit Pawar in Dhule Dhule News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष रणजित भोसले हे खासदार शरद पवार गटातच असल्याने अजित पवार यांच्या गटाला नवीन चेहरा शोधावा लागतोय.

महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेच्या माध्यमातून अलीकडच्या काळात उत्तर महाराष्ट्रात शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढा सुरू करणाऱ्या श्री. भावसार यांनी मुंबईत अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांची भेट घेतलीय.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ajit Pawar
Ajit Pawar NCP : अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाईची मागणी; शरद पवार गटाकडून हालचालींना वेग

त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांसोबत ते उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे नवीन चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचे पवार गटाकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय चळवळीत सहभागी आहे. संघटनेच्या माध्यमातून काम सुरूच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि नेते अजित दादा पवार यांची कार्यक्षमता विचारात घेता पक्षाने संधी दिल्यास निश्चित बदल घडून धुळे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असे श्री. भावसार यानिमित्ताने म्हणाले.

Ajit Pawar
Dhule NCP News: शिरपूर राष्ट्रवादीतही उभी फूट..! दोन गटांवर शिक्कामोर्तब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.