Dhule News : भवानी मातेच्या यात्रोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल; हजारोंचा सहभाग

Bhavani Mata Yatra festival
Bhavani Mata Yatra festivalesakal
Updated on

Dhule News : येथील ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला. ग्रामपंचायतीकडून प्रथम आहेर चढवून पूजन झाले. त्यानंतर दर्शन आणि यात्रोत्सवातील उलाढालींना वेग आला. (Big financial turnover in Bhavani Mata Yatra festival dhule news)

भवानी मातेचा नवस फेडण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यात्रेतातील जीवनावश्यक वस्तू, मनोरंजनाची साधने आणि विविध खाद्यपदार्थांच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली. यंदा तगतराव मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. हजारो आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले. तरुणांचा मोठा सहभाग होता.

आहेर, नवस फेडण्यासाठी गर्दी

भवानी मातेचे दाक्षिणात्य पद्धतीचे मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे गटनेते भगवान पाटील, माजी शिक्षण सभापती नूतन पाटील, तत्कालीन लोकप्रतिनिंधीचे विशेष प्रयत्न आहेत. त्यातून पन्नास ते साठ लाखातून हे भव्य मंदिर उभे राहिले आहे. यात्रोत्सवात देवीला आहेर अर्पण करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आणखी दोन दिवस भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Bhavani Mata Yatra festival
Nashik News: अवकाळीमुळे लाल कांद्याचे बियाणे उत्पादन घटणार; जादादराने खरेदी करण्याची उत्पादकांवर वेळ

आबालवृद्धांना तगतराव मिरवणुकीची मौज

यंदा दोन लाखातून साकारलेला लाकडी तगतराव यात्रेचे आकर्षण आहे. तगतरावमधून तमाशा कलावंतांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान झाला. तगतरावला जुंपण्यासाठी तीन बैलजोडींना मान देण्यात आला. त्यासाठी बोली लावण्यात आली होती, या मिरवणुकीत पाच हजारापेक्षा अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

मिकी माऊसचा आनंद

यात्रेतील आकाश पाळणे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. बालकांना मिकी माऊस घसरगुंडी खुणावत आहे. तर जम्पिंग मॅटवरचा आनंद शालेय विद्यार्थी लुटत आहेत.

तमाशाच्या हजेरीची परंपरा कायम

तमाशा कलाकारांची तगतरावमधून मिरवणूक आणि संध्याकाळी हजेरीची प्रथा आजही कायम आहे. मिरवणुकीनंतर तमाशा कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. रात्री तमाशा कसा असेल. त्यातील कलाकार कशी कला सादर करतील. याची झलक अर्धा तासच्या हजेरीतून दाखवली जाते. बंडू वाणी तमाशा पथकातील कलाकारांनी हजेरीत मोठी झलक दाखवून ठसा उमटविला.

Bhavani Mata Yatra festival
Kalika Mata Yatrotsav : चारच दिवसात 750 बैलांची विक्री; व्यापारी, खरेदीदारांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.