Dhule News : श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त धुळे शहरातून दुचाकी रॅली

अयोध्येत नवनिर्माण झालेल्या श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) श्री रामलल्ला विराजमान होत आहेत. त्यामुळे शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शहरातील वातावरण श्रीराममय झाले आहे.
Officials of BJP, Shiv Sena Shinde group participated in the rally held on the occasion of Shri Ram Mandir
Officials of BJP, Shiv Sena Shinde group participated in the rally held on the occasion of Shri Ram Mandiresakal
Updated on

Dhule News : अयोध्येत नवनिर्माण झालेल्या श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) श्री रामलल्ला विराजमान होत आहेत. त्यामुळे शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शहरातील वातावरण श्रीराममय झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाउंड येथून विराट दुचाकी रॅली निघाली. भगवे ध्वज आणि जय श्रीरामांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. (Bike rally from Dhule city on occasion of Shriram Mandir celebration news)

शिवसेनेच्या शिंदे गटाचे अविष्कार भुसे यांच्या नेतृत्वात रॅली निघाली. मालेगाव रोडमार्गे मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले.

आग्रा रोड, पाचकंदील, गांधी चौकमार्गे देवपूरमधील दत्तमंदिर चौक, पुन्हा पांझरा नदीकिनारी उभारलेल्या अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीजवळ रॅलीचा समारोप झाला.

Officials of BJP, Shiv Sena Shinde group participated in the rally held on the occasion of Shri Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : पण राम आत्ताच का? हरवलेल्या संस्कृतीच्या पुनर्उभारणीसाठी...

श्री. भुसे, भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, गजेंद्र अंपळकर, सरचिटणीस चेतन मंडोरे, शीतल नवले, ओम खंडेलवाल, मनोज मोरे, सतीश महाले, संजय गुजराथी, संजय वाल्हे, देवेंद्र सोनार.

विजय जाधव, संतोष मंडोरे, पंकज धात्रक, सचिन शेवतकर, जयेश माळी, सुहास अंपळकर, विकी परदेशी, मोहन टकले, पप्पू ढापसे, मयूर कंड्रे, समीर गवळी आदी उपस्थित होते.

Officials of BJP, Shiv Sena Shinde group participated in the rally held on the occasion of Shri Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : दक्षिण मध्य रेल्वेतर्फ 4 फेब्रुवारीला मराठवाड्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.