धुळे : बायोडिझेलची अवैध वाहतूक करणारा टँकर पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून रात्री पकडला. टँकरसह १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी टँकरचालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. साक्री ग्रामीणचे डिवायएसपी प्रदीप मैराळे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पथकाने ही कारवाई केली. (Biodiesel tanker caught in Ajang Shivarat Dhule Latest marathi news)
डिवायएसपी श्री. मैराळे यांना बायोडिझेलची टँकरद्वारे अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी त्या टँकरचा शोध सुरू केला. नागपूर-सुरत महामार्गावर अजंग (ता. धुळे) शिवारातील हॉटेल एकता समोर (जीजे २१ टी ५९४३) क्रमांकाचा टँकर पथकाला आढळून आला.
टँकरची तपासणी केली असता त्यात सात लाख १९ हजार ६०० रुपये किमतीचे बायोडिझल आढळून आले. टॅंकरसह एकूण १७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी टँकरचालक सुरजितसिंग चुनिलाल वसावा (वय-२७, रा. अमियार, जि.नर्मदा, गुजरात) व सहचालक साहिल अब्दुल कादर हाफीज (वय-२२, रा. रामपूरा, ता. सुरत, गुजरात) या दोघांना ताब्यात घेतले.
अस्लमभाई याच्या सांगण्यावरून बायोडिझेलची वाहतूक करत असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पोलिस नाईक मुकेश पवार यांच्या फिर्यादीवरून संबंधित तिघांसह ट्रेडर्स मलकापूरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएपी श्री. मैराळे, पोलिस निरीक्षक श्री. शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे, एएसआय पंजाबराव साळुंखे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, किशोर खैरनार, मुकेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.