Dhule Accident News : भाजप महामंत्री चौधरींच्या कारला डंपरची धडक

सोनगीरकडे जाणाऱ्या डंपरने धुळे येथून नंदुरबारकडे जाणारे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या फॉर्च्युनर कारला समोरून धडक दिल्याने कारचे नुकसान झाले.
Accidental dumper and damage to car near village.
Accidental dumper and damage to car near village.esakal
Updated on

Dhule Accident News : सोनगीर-चिमठाणे राज्य महामार्ग एकवर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ सोमवारी (ता. ५) दुपारी साडेचारच्या सुमारास दोंडाईचाहून सोनगीरकडे जाणाऱ्या डंपरने धुळे येथून नंदुरबारकडे जाणारे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या फॉर्च्युनर कारला समोरून धडक दिल्याने कारचे नुकसान झाले.

अपघातात कुणीही जखमी झाले नाही. अपघाताबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP General Minister Chaudhary car was hit by dumper dhule accident news)

भाजपचे चौधरी धुळे येथील आढावा बैठकीनंतर नंदुरबारकडे कारने (एमएच ३९ एबी ७५१५) जात असताना चिमठाणे गावाजवळील जनता हायस्कूलसमोरील गतिरोधकाजवळ समोरून येणाऱ्या डंपरने (एमएच १८ बीजी २३४८) धडक दिली.

यात कारचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

Accidental dumper and damage to car near village.
Dhule News : जिल्ह्यात 108 वर्गखोल्या निर्लेखनाचा आदेश; 35 शाळांना संरक्षक भिंतींचा मिळणार आसरा

डंपरचालक संतोष बाबूराव पवार (वय ५०, रा. लामकानी, ता. धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघातांची मालिका

सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एक व शिंदखेडा-साक्री राज्य मार्ग बारा हा चौपदरी रस्ता हा चिमठाणे गावातून जातो. मात्र, सात दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. पोलिसांनी व परिवहन विभागाने वाहनचालकांचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Accidental dumper and damage to car near village.
Nashik Accident News : क्रेन तुटल्याने 3 युवकांचा मृत्यू; गावावर शोककळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.