BJP-Shivsena: विधानसभेची 'ती' जागा शिवसेनेला; भाजपमध्ये अस्वस्थता! पक्षाला घरघर लागण्याची भीती; 'आरएसएस' सह नेत्यांचे वेधले लक्ष

BJP-Shivsena Seat Sharing: पक्षाचा खासदार नाही, आमदार नाही, विधानसभेनंतर महापालिका निवडणूक झाल्यास भाजपने काय करावे यांसह विविध प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असतील.
Shivsena BJP Seat Sharing Fo Vidhan Sabha
Shivsena BJP Seat Sharing Fo Vidhan SabhaEsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर मतदारसंघाची जागा शिवसेनेला (शिंदे गट) बहाल झाली आहे, अशी माहिती येऊन थडकताच येथील भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. शिवसेनेला जागा गेल्यास भाजपला येथे घरघर लागेल, पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशा विचाराने अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यावर ही भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (आरएसएस), भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांना पत्र, ई-मेल, व्हॉटस्अॅपद्वारे कळविण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुती आणि महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुती. महाविकास आघाडी बंडखोरी वाढण्याच्या भीतीने मतदारसंघनिहाय अंतिम उमेदवारांची नावे घोषित करण्यास विलंब लावत असल्याचे मानले जाते.

जागा वाटपाचे संकेत

महायुतीत धुळे शहर व साक्री मतदारसंघ शिवसेना, तर धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर भाजपला, तसेच महाविकास आघाडीत धुळे शहर शिवसेना (उबाठा), धुळे ग्रामीण व साक्री काँग्रेस, तर शिंदखेडा व शिरपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) देण्यात आल्याचे संकेत आहेत.

महाविकास आघाडीत शिंदखेडा, धुळे मतदारसंघ काँग्रेस, धुळे शहर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने मागितला आहे. त्यामुळे रंगत वाढली आहे. असे असताना शिवसेनेला (शिंदे गट) धुळे शहर मतदारसंघाची जागा दिली जात असल्याच्या माहितीने येथील भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली

Shivsena BJP Seat Sharing Fo Vidhan Sabha
VBA Candidates: विधानसभेसाठी 'वंचित'कडून 10 उमेदवार जाहीर; सर्व उमेदवार मुस्लिम

कार्यकर्त्यांची भावना

धुळे शहरात शिवसेना शिंदे गटाला जागा सुटल्यास भाजपने निर्माण केलेल्या अस्तित्वाला क्षती पोचेल. तसेच पक्षाचा खासदार नाही, आमदार नाही, विधानसभेनंतर महापालिका निवडणूक झाल्यास भाजपने काय करावे यांसह विविध प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असतील. गेल्या पाच वर्षांत येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विविध कार्यक्रमांप्रमाणे बूथरचना, शक्ती केंद्रे यांसह विविध बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

भाजपची एक ताकद शहरात निर्माण करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. काही बाबींवर सामंजस्याने तोडगा काढला तर पक्षीय ताकद एकवटून विधानसभा, महापालिका निवडणूक जिंकता येईल, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहे. त्याची पक्षाकडून कशी दखल घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

#ElectionWithSakal

Shivsena BJP Seat Sharing Fo Vidhan Sabha
Sharad Pawar: शरद पवारांकडून 11 नेत्यांच्या मुलाखती; तर परिचारिकांनी घेतली फडणवीसांनी भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.