Dhule News : भाजप, शिवसेना ठाकरे गट हॉकर्सच्या पाठीशी

शहरातील धगधगत्या हॉकर्सच्या प्रश्‍नात गुरुवारी (ता. ४) संबंधित व्यावसायिकांना साथ देत भाजपसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने उडी घेतली.
BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.
BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.esakal
Updated on

Dhule News : शहरातील धगधगत्या हॉकर्सच्या प्रश्‍नात गुरुवारी (ता. ४) संबंधित व्यावसायिकांना साथ देत भाजपसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने उडी घेतली. दुसऱ्या दिवशी हॉकर्सने ढोल बजाओ आंदोलनातून महापालिकेचे लक्ष वेधले.

सामंजस्याने तोडगा काढावा, आग्रा रोडवर व्यवसाय करू द्यावा, अशी आग्रही मागणी हॉकर्सतर्फे झाली. (BJP, Shiv Sena Thackeray group support hawkers Dhule News)

मात्र, मनपा प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी वाहतुकीस अडथळा होईल अशा कृत्यास पाठबळ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आंदोलकांना माघारी परतावे लागले.शहरातील आग्रा रोडसह इतर प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा विविध व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांच्या समस्या समजून घ्या.

अशी भूमिका घेत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हॉकर्सचा अर्थात हातगाडीधारक, पथारीवरील व्यावसायिकांचा महापालिकेवर मोर्चा नेला. पथारी व्यावसायिक आणि लोटगाडीधारकांवर महापालिका प्रशासन अन्याय करीत आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

पोलिस कारवाई सुरूच

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर पथारी व्यावसायिक आणि लोटगाडीधारक व्यवसाय करतात. साहजिकच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. पथारी व्यावसायिकांना हक्काची जागा द्यावी यासाठी सर्वच पक्षांकडून आंदोलन झाले.

नंतर आयुक्त तथा प्रशासक दगडे-पाटील यांनी पांझरा नदीकिनाऱ्यासह अन्य ठिकाणी व्यावसायिकांना जागा देऊ केली. त्याच वेळी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिकांना हटविण्यात आले.

BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.
Dhule Municipality News : निर्धारित जागेकडे हॉकर्स फिरकले नाहीत; महापालिकेची कसोटी

प्रशासन भूमिकेवर ठाम

कारवाईच्या पहिल्या दिवशी व्यावसायिकांनी मोर्चा काढला. नंतर दुसऱ्या दिवशी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना सहकार्य करीत महापालिकेवर ढोल बजाओ आंदोलनातून मोर्चा काढला. भाजपचे महादेव परदेशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

अनेक वर्षे रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्यांचा सहानुभूतीने विचार व्हावा, असे राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. व्यावसायिकांच्या अडचणी समजून घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न स्थानिक राजकीय मंडळींनी केला.

परंतु मनपा प्रशासक तथा आयुक्त दगडे-पाटील यांनी वाहतुकीस अडथळा होईल अशा कृत्याला पाठबळ दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. परिणामी, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर काही काळ निदर्शने करीत आंदोलक माघारी परतले.

शिवसेनेची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे विधानसभा संघटक ललित माळी यांनी सांगितले, की भाजप सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाशी संगनमत करीत भांडवलदार व भूमाफियांना संरक्षित करण्यासाठी कष्टकरी समुदायास पायाखाली तुडविण्याचा प्रयत्न थांबवावा. हॉकर्सच्या प्रश्‍नावर सामंजस्याने मार्ग काढावा.

BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.
Nashik Ramesh Bais : ...तर राज्‍यपालांची गाडी अडवू; विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांची भूमिका

पाचकंदील येथे नवमार्केट साकारणार आहे. शहरातील विविध भागात रस्त्यावर भाजीपाला व किरकोळ वस्तू विक्रेत्यांसाठी अधिकृत व कायमस्वरूपीची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

केवळ शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले व नागरी सुविधांसाठी उपयुक्त भूखंड बिल्डर, भूमाफिया तसेच भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी भाजप सत्ताधारांनी त्यांच्या मनपातील कार्यकाळात प्रयत्न केले. सत्तेचा गैरवापर करून शहरातील गरीब, कष्टकरी वर्गावर बुलडोझर फिरवून त्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे.

अन्याय करू नका

भाजीपाला व किरकोळ वस्तू खरेदीसाठी सोयीची जागा नसल्याने शहरात नागरिकांची गैरसोय तर होतच आहे; परंतु त्यामुळे हातावर पोट असणारे पीडित, कष्टकरी कुटुंब केवळ बिल्डर व भूमाफियांना पैसे कमावता यावेत रस्त्यावर आणले जाणार आहेत.

याबाबत आंदोलने केले आहे. मात्र, मनपात असताना भाजपने बिल्डर, भूमाफियांना छुप्या पाठबळाची भूमिका निभावलेली आहे. ते लक्षात घेत हॉकर्सचा प्रश्‍न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा श्री. माळी, हॉकर्स सागर निकम, प्रमोद चौधरी.

BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.
Nashik Inspirational News: भुकेलेल्यांना अन्न; हीच खरी भक्ती! त्यांच्या नित्यनेमाने रुग्णांच्या नातलगांना दररोज मिळतेय भोजन

सचिन वराडे, सुनील माळी, आबा भडाके, रवींद्र मराठे, अनिल कोळी, जलील अन्सारी, इम्रान पठाण, पंकज लोणारी, विजय नागमोती, संदीप सानप, पिंटू वराडे, रवींद्र वाघ, जितेंद्र चौधरी, राहुल धात्रक, रवी थोरात, कैलास माळी, महेश चौधरी आदींनी दिला.

लोटगाडी नाही, तर टोपल्या घेऊन बसू...’

आम्हाला आग्रा रोडवरच व्यवसाय करू द्यावा, आम्ही लोटगाडी लावणार नाही. टोपल्यांद्वारे ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हॉकर्सने केली. शहर अतिक्रमणमुक्त झाले पाहिजे. मात्र, आग्रा रोडच कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करीत गरीब, बेरोजगारांवर होणार अन्याय तत्काळ थांबवावा.

तसेच आग्रा रोडवर हॉकर्स झोन जाहीर करावा. पोलिस कारवाई थांबवावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल, असे आग्रा रोडवरील हॉकर्सने आयुक्तांपुढे भूमिका मांडताना सांगितले..

BJP's Mahadev Pardeshi speaking during the protest held at the entrance of Hawker's Question Municipal Corporation on Thursday. In the second photograph, Lalit Mali and hawkers giving a statement to Mahesh Shelar.
Dhule News : सचिवांकडून मालमत्ता कराबाबत कोष्टक मान्य : आमदार फारूक शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.