Raosaheb Danve News : सर्व विरोधक एकत्र आले तरी सत्ता मात्र... आगामी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे विधान

येथील पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुभाष भामरे, बबन चौधरी, आमदार जयकुमार रावल, आदी.
Raosaheb Danve News : सर्व विरोधक एकत्र आले तरी सत्ता मात्र... आगामी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे विधान
Updated on

Raosaheb Danve News : काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चे केवळ आश्वासन दिले; परंतु नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. मोदी हे सक्षम पंतप्रधान असून, देशातील सर्व विरोधक एकत्र आले तरी ते मोदींचा पराभव करू शकत नाहीत.

आगामी निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षच सत्तेवर येईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.

येथील पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल अध्यक्षस्थानी होते. (BJP will be elected again statement of Raosaheb Danve dhule news )

माजी संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सभागृह नेते अनिल वानखेडे, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा रजनी वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज निकम, बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. दानवे यांचे दुपारी साडेबारानंतर रेल्वेने आगमन झाले. त्यांनी कुमरेज परिसरातील पाणीयोजनेला भेट देत पाहणी करून पाणीयोजनेचे उद्‍घाटन केले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शहरातील गांधी चौकात शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत गोरगरिबांसाठी केंद्र सरकार व राज्य शासन करीत असलेल्या कामांची माहिती दिली.

श्री. दानवे म्हणाले, की मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यात एक रुपयात पीकविमा योजना आणून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले. गरीब जनतेला मोफत रेशन देण्याचा निर्णयही अमलात आणला. उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना आदी योजना राबवून महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Raosaheb Danve News : सर्व विरोधक एकत्र आले तरी सत्ता मात्र... आगामी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे विधान
Raosaheb Danve News : नंदुरबार स्थानकाचा ‘अमृत भारत’मध्ये समावेश होणार : रावसाहेब दानवे

काँग्रेस काळात नेत्यांनी फक्त कुटुंबाचा विकास कसा होईल, याकडेच लक्ष दिले. या उलट मोदी सरकारने देशातील जनतेला केंद्रबिंदू मानून विविध क्षेत्रांत विकासाची कामे हाती घेतली. महाराष्ट्राच्या वाटेला रेल्वेसाठी १२ हजार कोटी रुपये केंद्राने दिले. आगामी काळात देश अधिक सक्षम होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुण्यासाठी रेल्वे लवकरच

भुसावळ-सुरत रेल्वेगाडी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येईल. पुणे येथे जाण्यासाठी रेल्वेगाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला असून, ही गाडीही लवकरच सुरू करण्यात येईल, असेही श्री. दानवे यांनी सांगितले.

‘सुलवाडी जामफल कनोली’ यंदा पूर्ण होणार

डॉ. भामरे यांनी सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सुलवाडी जामफळ कनोली योजनेस केंद्राकडून २४० कोटी रुपये मिळाले. ८० टक्के काम योजनेचे पूर्ण झाल्याचे सांगितले. या वर्षात ही सिंचन योजना पूर्ण होईल. शिंदखेडा तालुक्यातील १०० आणि धुळे तालुक्यातील १०० अशा २०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली निघेल. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाबाबत पहिल्या फेजमधील धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. तापी बुराई योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

Raosaheb Danve News : सर्व विरोधक एकत्र आले तरी सत्ता मात्र... आगामी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे विधान
Raosaheb Danve : मोदींची 9 वर्षातील कामे जनतेपर्यत न्या : दानवे

आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याचे स्पष्ट केले‌. शिंदखेडा शहरासाठी पाणी योजना, प्रशासकीय इमारती, रस्त्यांची कामे करण्यात आली. विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींवर मात करून विकासकामे करण्यात यशस्वी झालो. २०१६ नंतर मतदारसंघावरील दुष्काळग्रस्त हा डाग पुसण्यात यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.

शिंदखेडा नगरपंचायतीचे सभागृह नेते अनिल वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी प्रशांत बीडगर यांनी प्रास्ताविक केले. डी. एस. गिरासे यांनी सूत्रसंचालन केले.

प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी आभार मानले. दरम्यान, २० वर्षांपासून शिंदखेड्यात नागरिकांची तक्रार येऊ न देता नियमितपणे पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचारी पंडित माळी यांचा मंत्री दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Raosaheb Danve News : सर्व विरोधक एकत्र आले तरी सत्ता मात्र... आगामी निवडणुकीबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे विधान
Raosaheb Danve : PM मोदींनी सहा महिनेआधीच केली होती कोरोनाची तयारी; दानवेंचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.