Dhule News : जिल्ह्यातील स्तर एक ते पाच, सहा ते आठ, नऊ ते दहापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयासाठी समग्र शिक्षण योजनेच्या स्टार्सअंतर्गत स्तराधारित वाचन साहित्याच्या सुमारे ७० हजार ६९४ वर पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.
ही पुस्तके लवकरच निवडक शाळांना पुरविली जातील. धुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षणविस्ताराधिकारी रत्नप्रभा दंडगव्हाळ यांच्या उपस्थित शिक्षण विभागाने अलीकडेच ही पुस्तके ताब्यात घेतली.(Books will soon be provided to the selected schools under Samagra Shikshan Yojana dhule news)
समग्र शिक्षण अभियानाचा मुख्य उद्देश शिक्षणाचा स्तर सुधारण्याचा आहे. याशिवाय शाळेपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश या योजनेत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार ही योजना तयार करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना खात्रीशीर, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तसेच प्रत्येक स्तरावर शिक्षणाचे परिणाम मिळावेत यासाठी केंद्र सरकारने समग्र शिक्षण अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि शिक्षकांचे प्रशिक्षण याकडेही लक्ष दिले जाते.
त्यात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक विकास व्हावा, या योजनेत मुलांना दर्जेदार शिक्षण देणे आणि शैक्षणिक सुविधांचे चांगले परिणाम यावर भर दिला जातो.
तालुकास्तरावर पुरवठा
स्टार्स प्रकल्पांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमांतर्गत मराठी माध्यमाच्या पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांचे वाचनकौशल्य विकसित होण्यासाठी स्तराधारित वाचन साहित्यनिर्मिती केली आहे. सर्व साहित्य जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत वितरित करण्यात आले.
त्यानुसार अधीनस्त तालुकास्तरावर साहित्य प्राप्त झाले आहे. त्याचे शाळेपर्यंतचे वितरण मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. स्तराधारित वाचन साहित्य हे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री चारही तालुकास्तरापर्यंत पोचविले आहे.
समन्वयक नियुक्ती
जिल्हा समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी प्राथमिक व तालुका समन्वयक यांची नियुक्ती झाली आहे. एका संचात दहा स्तराधारित वाचन पुस्तके आहेत. पुस्तक साहित्य कार्यक्षेत्रातील पहिली व दुसरीचे वर्ग असणाऱ्या मराठी माध्यमाच्या सर्व शासकीय शाळा (विद्यानिकेतन, सराव पाठशाळा, समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या शासकीय शाळा) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, कटक मंडळे) यांना प्रत्येकी एक संच वितरित होईल.
स्तराधारित वाचन साहित्यात समन्वयक म्हणून डायट कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्तराधारित वाचन साहित्य तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोचविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी संबंधित शाळा, साधन व्यक्ती, शिक्षक यांच्या मदतीने वितरणाचे नियोजन करतील.
विद्यार्थ्यांच्या क्षमतेचाही विकास
समग्र शिक्षण योजनेंतर्गत एमपीएससीच्या सूचनेनुसार धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यांतील स्तर एक ते पाच, सहा ते आठ, नऊ ते दहा विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयासाठी स्टार्सअंतर्गत स्तराधारित वाचन साहित्याची ७२ हजार ६९४ पुस्तके प्राप्त झाली आहेत.
ती लवकरच निवडक शाळांवर वितरित केली जातील. ग्रंथालयातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी, विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षांसाठी, संस्कारक्षम परिपाठासाठी, वक्तृत्व, गायन, कथाकथन स्पर्धेसाठी, बुद्धिमता तसेच सरावासाठी उपयोग होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.