खवय्यानो..आता हिवाळ्यात चिकनवर मनसोक्त ताव मारता येईल...कारण..

chicken gravy.jpg
chicken gravy.jpg
Updated on

नाशिक : हिवाळा म्हटले, की चिकनचा आग्रह वाढतो आणि ब्रॉयलर कोंबडी उद्योगाला झळाळी येते, असा गेल्या वर्षापर्यंतचा अनुभव जमेस होता. यंदा मात्र हा उद्योग मंदीत असून, उत्पादन खर्चापेक्षा दहा रुपये किलो स्वस्त भावाने कोंबड्या विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. सद्यःस्थितीत 65 रुपये किलो भावाने ब्रॉयलर कोंबड्या विकल्या जात आहेत. 

उत्पादनखर्च किलोला 75 अन्‌ विक्री 65 रुपयांना 

दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियानात ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी महाराष्ट्रातील कोंबड्यांना मागणी असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश ते नागपूरपर्यंत स्थानिक कोंबड्या विक्रीस आल्या. महाराष्ट्रातील 30 ते 40 टक्के कोंबड्या गुजरात आणि मध्य प्रदेशात विकल्या जातात. उत्तरेतील ब्रॉयलर कोंबड्या जागेवर 40 रुपये किलो, तर पोच 60 रुपये किलो भावाने विकल्या जातात. मुंबईचा अपवाद वगळता इतरत्र मार्गशीर्षमध्ये चिकन खाण्याकडे ग्राहकांचा कल कमी असतो. शिवाय मका व सोयाबिनचे भाव वधारल्याने ब्रॉयलर उद्योगात मंदी वाढली आहे. 

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय...... 

मुंबईत रोज 800 टनांची विक्री..
मुंबईतील ग्राहकांना महाराष्ट्रातील उत्पादक रोज 700 ते 800 टन ब्रॉयलर कोंबड्या पाठवतात. त्यात घट झालेली नसल्याने मंदीचा आणखी फटका वाढण्याची शक्‍यता दिसत नाही. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात महिन्याला चार कोटी ब्रॉयलर कोंबड्या विक्रीसाठी तयार होताहेत. वजनाचा विचार केल्यास एकत्रित 10 कोटी किलोग्रॅम वजन भरेल. 

उत्पादन खर्चात 13 रुपयांनी वाढ 

मक्‍याचा क्विंटलचा भाव चौदाशे अन्‌ सोयामिलचा भाव दोन हजार 800 रुपये, असा खाद्याचा किलोचा खर्च गेल्या वर्षी 23 रुपये होता. अवकाळी पावसाने मक्‍याचा क्विंटलचा भाव दोन हजार, तर सोयामिलचा भाव 3 हजार 700 रुपये झाल्याने खाद्याचा किलोचा खर्च आता 30 रुपये झाला. त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक किलो ब्रॉयलर कोंबडीसाठी 62 रुपये खर्च यायचा आणि 75 रुपये किलो भावाने कोंबडी विकली जायची. आता मात्र 65 रुपये किलो भावाने कोंबडी विकावी लागते. याशिवाय हिवाळ्यामुळे एका ब्रॉयलर कोंबडीचे वजन 2 हजार 200 ग्रॅमवरून अडीच हजार ग्रॅमपर्यंत पोचल्याने वजन वाढले आहे. 
 

उत्तरेतील अमाप उत्पादनाबरोबर मार्गशीर्षचा परिणाम 

नाताळपासून नवीन वर्षापर्यंत खपात 20 टक्‍क्‍यांनी वृद्धी होते. नेमक्‍या याच काळात मार्गशीर्ष महिना संपत असल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचे भाव वाढतील. तोपर्यंत उत्पादकांना बाजारपेठेत टिकून राहावे लागेल. - उद्धव आहेर, आनंद ऍग्रो समूह  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.