तळोदा : शहरातील कालभैरव मंदिराजवळ जिल्हा परिषद शाळा क्रमांक नऊसमोर गटारावरील स्लॅब दीड महिन्यापासून काढण्यात आला आहे. तरीदेखील नवीन स्लॅब टाकला जात नसल्याने परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना त्रासाचे ठरत आहे.
त्यामुळे गटारावरील स्लॅब तातडीने टाकण्यात यावा अशी मागणी होत आहे. गटारीतून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी वाहत असते. (Broken slab on drain is Make disturbance for students and farmer in nandurbar city Nandurbar News)
गटार तुंबल्याने गटाराचे पाणी रस्त्यावरही पसरते. दुरुस्ती व गटार साफ करण्यासाठी गटारावरील संपूर्ण स्लॅब काढून टाकण्यात आला होता.
मात्र स्लॅब काढून दीड महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीदेखील येथे नवीन स्लॅब टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शेत शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.