Nandurbar News : पोळ्याआधीच बैलाच्या मृत्यूने सारेच गहिवरले! मोड येथील शेतकऱ्यावर दुःख ओढवले

The remaining bull of the pair after the death of the bull.
The remaining bull of the pair after the death of the bull. esakal
Updated on

Nandurbar News : दोन दिवसांवर आलेल्या पोळा सणाआधीच बैलांची सेवा करण्याची संधी मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यावर बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू पाहण्याची वेळ आल्याची घटना मोड (ता. तळोदा) येथे सोमवारी (ता. ११) घडली.

पोळा सण शेतकऱ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. मात्र त्याआधीच आपल्या सर्जा-राजाचा मृत्यू पाहण्याचे दुःख शेतकरी कुटुंबावर आले आहे. त्यामुळे मोड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

मोड (ता. तळोदा) येथील वयोवृद्ध शेतकरी भरतसिंग प्रतापसिंग राजपूत (वय ७०) यांच्याकडे बैलजोडी आहे. त्या बैलजोडीच्या सहाय्याने ते आपली अडीच एकर शेती करतात. (bull in pair died while being treated nandurbar news)

स्वतःच्या शेतीतील मशागतीची कामे करून ते इतरांच्या शेतात औत घेऊन जाऊन मशागतीची कामे करत असत. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी बैलजोडी मुख्य साधन होते. त्यातच आपल्या अल्प शेतजमिनीत व इतरांकडे भाडेतत्त्वाने मशागतीची कामे करून त्यांच्या आयुष्याचा गाडा हाकला जात होता.

मात्र मागील काही दिवसांपासून बैलजोडीतील एका बैलाची प्रकृती बिघडली. त्यात औषधोपचारदेखील सुरू केला. त्यात बैलाला लम्पी आजाराची लागण झाली होती. पशुवैद्यकीय चिकित्सकांना दाखवून इंजेक्शन व औषधे दिली जात होती.

पोळा सणाआधी आपला बैल चांगला होईल, अशी आशा शेतकरी कुटुंबाला होती. ही बैलजोडी त्यांच्याकडे सात-आठ वर्षांपासून होती. त्या बैलांशी घरातील नातवंडे व कुटुंबातील इतर सदस्यांचा विशेष लळा होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The remaining bull of the pair after the death of the bull.
Nandurbar News : शिवसेनेचे आमदार पाडवी यांनीच ठोकले कुलूप; जिल्हा परिषदेतील धुसफूस चव्हाट्यावर

सोमवारी (ता. ११) बैलजोडीतील त्या बैलाचा औषधोपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला. त्यामुळे कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा सण मानल्या जाणाऱ्या पोळा सणाआधीच शेतकरी कुटुंबावर दुःखाचा आघात झाला, तर पोळा सणाच्या आनंदावर विरजण पडले.

दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा व्यवस्थित हाकण्यासाठी त्यांना बैलाची गरज भासणार आहे. मात्र नवीन बैल येईल तेव्हा येईल पण आजच पोळा सणाआधी शेतकऱ्याला आपल्या सर्जाचा मृत्यू पाहण्याचे दुःख ओढवले आहे. त्यामुळे मोड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

परिसरात चर्चा

सध्याचा यांत्रिक युगात आधीच शेतकऱ्यांकडील बैलजोड्या कमी झाल्या आहेत. तळोदा शहरात तर बैलजोड्यांची संख्या नगण्य झाली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करण्याची पद्धत टिकून आहे. त्यामुळे बैलजोडी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यात बैल व शेतकरी यांचे नाते मित्रत्वाचे राहते. त्यात बैलांची सेवा व त्यांच्यावर लावलेला जीव शेतकऱ्याला नेहमीच आठवणीत राहतो. त्यात बैलाच्या मृत्यू ही मनाला चटका लावणारी घटना ठरते. त्यात पोळ्याआधीच अशी घटना घडल्याने सर्वत्र शेतकऱ्यांच्या मित्र असलेल्या सर्जा-राजाची चर्चा होत आहे.

The remaining bull of the pair after the death of the bull.
Nandurbar News : कुपोषण, बालमृत्यूबाबत नंदुरबार राज्यात अव्वल; आरोग्यसेवेकडे आरोग्यमंत्र्यांची डोळेझाक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.