पिंपळनेर : येथील मंगलमूर्तीनगर व माऊलीनगरमध्ये बुधवारी (ता.२७) एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजांचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे कापड तसेच, रोख रक्कम असा अंदाजे पाच लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पिंपळनेर शहरातील या आठवड्यातील ही सलग पाचवी घटना आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंगलमूर्तीनगर मध्ये घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. पिंपळनेर येथील सटाणा रस्त्याला लागून असलेली नव्या वसाहती मधील मंगलमूर्तीनगरमध्ये राहणारे ग्रामपंचायत सदस्य मीना ठाकरे बाहेरगावी गेल्या काही दिवसापासून बाहेरगावी होते. (Burglary again in city 5 lakh of theft Dhule News)
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
शिवाय, शेतात कांदे लागवडीचे काम सुरू आहे, म्हणून सलग तीन दिवसांपासून घर बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ठेवलेल्या अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या, तर वरच्या मजल्यावर खोल्यांमध्ये असलेले कपाटात ही त्यांनी फोडून कपाटातील वस्तू व समान अस्ताव्यस्त फेकून दिले.
यात ठाकरे यांच्या सुनेची अंगठी, मुलाच्या सोन्याची अंगठी व सोन्याची चेन, मीना ठाकरे यांची मंगलपोत तसेच, इतर किमती पॅन्ट शर्ट शिवण्यासाठी आणलेले कापड असा अंदाजे अडीच लाख व रोख ५० हजार असा तीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पोपट ठाकरे हे कोकणगाव येथून दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. तर माऊलीनगर मधील लताबाई अहिरराव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ७५ हजार रोख व दीड तोळे सोने असा एकूण दीड लाखाचा ऐवज लांबविला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.