Dhule Crime News : येथे चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू असून, सोने, चांदी व रोकडसह आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही महिन्यांपूर्वीच गावात दोन वेळा एकाच रात्री पाच ते सहा घरे चोरट्यांनी फोडली होती.
ती घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास सामोडे येथील नावागाव येथे चोरट्यांनी एकाच रात्री पुन्हा चार बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केली. (Burglary at 4 places in same night in Samode open challenge to police Dhule Crime News)
नावागाव येथील शेतकरी अशोक लक्ष्मण घरटे घरीच होते; परंतु ते रात्री घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले असता खालच्या मजल्याला कुलूप पाहून चोरट्यांनी डाव साधला व कडीकोयंडा तोडून आत शिरले.
आत शिरल्यानंतर घरातील कपाट तोडून कपाटामधील ११ तोळे सोने व ८५ हजार रोकड व किरकोळ चांदी असा मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागला. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा प्रमिलाबाई अशोक घरटे यांच्या घराकडे वळविला.
ते कामानिमित्त गावी गेले होते. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून तीन तोळे सोने व पाच हजार रोकड किरकोळ चांदी असा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी आपली पावले येथेच न थांबवता त्याच गावातील विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला राहणारे कृष्णा एकनाथ घरटे व रवींद्र रामदास घरटे यांच्या बंद घरांचे कुलूप तोडले पण तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही.
असा जवळजवळ आठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्यानंतर गावातून पळ काढला असे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निदर्शनास येत आहे. रविवारी पहाटे बाजूच्या रहिवाशांना घराचे कुलूप तुटलेले आढळल्यानंतर चारही घरांचे सामान अस्ताव्यस्त दिसून आले.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
ग्रामस्थांनी पिंपळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्वरित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी त्यांच्या पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.
गावात सतत चोऱ्यांचे प्रमाण वाढत होते म्हणून काही दिवसांपूर्वी संपूर्ण सामोडे गावात ग्रामपंचायतीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, गुरखाही नेमण्यात आला आहे. तरीही या सर्वांना भुरळ घालत चोरट्यांनी गावात मोठी धाडस केले असून, पोलिस प्रशासनाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलिसांनी गावातील कॅमेरे तपासणी केली असून, चोरांची ओळख स्पष्ट होत नसून पिंपळनेर पोलिस तपास करीत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.