Dhule News : अवकाळी पावसासह आरोग्य समस्या, विविध खाद्यपदार्थ व वस्तूंमधील दरवाढ, तसेच लग्नसराई थांबल्याने बाजारपेठेतील उलाढाल तुलनेत मंदावली आहे. त्यामुळे व्यापार ४० टक्क्यांनी माघारला आहे.
ही स्थिती मेमध्ये सुधारण्याची शक्यता व्यापारी क्षेत्रातून व्यक्त झाली. (business venture retreated by 40 percent Price hike due to unseasonal rains hit by suspension of wedding receptions Dhule News)
गेल्या पंधरा दिवसांतच जिरे, शेंगदाणा तेल, गहू, मिरचीसह डाळींमध्ये दरवाढ झाली आहे. शिवाय आकलनाच्या पलीकडे असलेले वाढते वीजबिल, पेट्रोल व डिझेलची शंभरी पार, अनुदान बंद आणि घरगुतीसह व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाढते दर आदींमुळे व्यापार व मासिक फॅमिली बजेटवर विपरीत परिणाम होत आहे.
मुलांचा शैक्षणिक खर्चही वाढता आहे. एप्रिलपासून अनेक सेवांचे दर, विमा हप्ता आणि ‘ईएमआय’ वाढल्याने वेगळा भुर्दंड त्या-त्या कुटुंबाला सोसावा लागत आहे. एरवीच्या मासिक फॅमिली बजेटपेक्षा त्यात सरासरी दीड ते अडीच हजारांचा खर्च अधिक वाढल्याने महिला वर्ग, कुटुंबप्रमुखांची ओढाताण होत आहे.
त्याचा परिणाम कुटुंबाच्या बचतीवर होत आहे. साहजिकच ते खर्चाला मर्यादा घालत असल्याने व्यापाराच्या उलाढालीवर परिणाम होत आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
कुटुंबाची अशी धडपड
या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग म्हणाले, की एप्रिलमध्ये लग्नसराई थांबली आहे. त्याचा परिणाम व्यापारी पेठेवर जाणवतो आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे तर शेतकरी घटकासह सर्वच घाबरलेल्या स्थितीत आहेत.
असे घटक हातचे राखून व्यवहार करत आहेत. यात एखाद्या कुटुंबाचा दरमहा वीस हजारांचा खर्च होत असल्याचे गृहीत धरले तर प्राप्त स्थितीत ते आता सरासरी पंधरा हजारांचा खर्च करण्यास पसंती देत आहेत.
अवकाळी पावसाची सध्या तरी स्थिती कायम आणि प्रसंगी दुष्काळ आला तर हातात काही पैसे राहू द्यावेत, अशा मनःस्थितीत असंख्य कुटुंबे आहेत. थोडक्यात भविष्याच्या चिंतेमुळे पैसे कसे सांभाळून ठेवता येतील, अशाही प्रयत्नात असंख्य कुटुंबे आहेत.
खर्चाच्या मर्यादेवर भर
विविध वस्तू व पदार्थांची दरवाढ, शिवाय अवकाळी पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी खर्च करावा लागत आहे. परिणामी, ते शक्य त्या खर्चाला कात्री लावण्यावर भर देत आहेत.
एकीकडे काही कारणाने मासिक फॅमिली बजेटवर परिणाम, तर दुसरीकडे दैनंदिन वा मासिक खर्चावर मर्यादा आणून काही पैसे हातात ठेवण्याकडे कल वाढल्याने त्याचा परिणाम व्यापारउदीम ४० टक्क्यांनी माघारला आहे, असे मत श्री. बंग यांनी व्यक्त केले.
"विविध वस्तू, दरवाढीमुळे सरासरी १० टक्के, लग्नसराई थांबल्याने सरासरी १० ते १५ टक्के, अवकाळी पावसामुळे सरासरी १० ते १५ टक्के परिणामामुळे एकूण सरासरी ४० टक्के व्यापार माघारला आहे. मात्र, मेमध्ये स्थिती सुधारेल, अशी आशा आहे."
-नितीन बंग, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.