Dhule News : जमीन खरेदी- विक्रीत हेराफेरी; व्यापाऱ्याची कोटीत फसवणूक

land purchase and sale law Fraud case
land purchase and sale law Fraud caseesakal
Updated on

धुळे : जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात हेराफेरी करीत व्यापाऱ्याची सव्वाकोटीत फसवणूक केली. या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह सहा संशयितांविरुद्ध दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (businessman cheated by manipulating land purchase sale transaction dhule news)

नंदुरबार येथील व्यापारी शेख फारुक शेख नजीर (रा. प्लॉट क्रमांक ७, गांधीनगर, नंदुरबार) यांनी दोंडाईचा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार २६ मे २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला.

दोंडाईचा शहरातील सर्व्हे नं ५६/१ वरील १६ हजार चौमी जमिनीचे मूळ मालक डॉ. हेमंत देशमुख (रा. दोंडाईचा), राजेंद्र विष्णू इंगळे (रा. धुळे), अंबादास कन्हय्यालाल मराठे (रा. दोंडाईचा) तसेच, रवींद्र देशमुख (रा. दोंडाईचा) यांनी मिळकत सर्व्हे नंबर ५६/९ ही व्यापारी शेख फारुक यांना विक्री केली.

त्यांच्या नावे खरेदीखत करून देण्याबाबत फिर्यादी शेख यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून १६ लाख रोख व एक कोटी चार लाख बँक खात्याद्वारे, असे एकूण एक कोटी वीस लाख रुपये स्वीकारले.

मिळकतीचा खरेदी- विक्रीचा व्यवहार व्यापारी शेख फारुक यांच्याशी झाला असल्याचे माहीत असूनही मिळकत ही संशयित राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदीखतातील संमतीदार असे दर्शवून खोट्या व बनावट खरेदी सौदा पावत्या तयार केल्या. अनिल चंपालाल पारख व गणेशमल भुरमल बंब (दोघे रा. दोंडाईचा) यांच्याशी संगनमताने कटकारस्थान रचले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

land purchase and sale law Fraud case
Dhule News : 'तो' मृतदेह बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश

त्यांच्याकडून पैसे स्वीकारून त्यांच्याशी करार करून तसे १९ ऑक्टोबर २०२२ ला रजिस्टर खरेदीखत करून देऊन व घेऊन व्यापारी शेख यांचा विश्वासघात केला. तसेच, त्यांची आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार झाली.

याबाबत व्यापारी शेख यांनी दहा जानेवारीला दोंडाईचा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. चौकशीअंती डॉ. देशमुख, राजेंद्र इंगळे, अंबादास मराठे, रवींद्र देशमुख, अनिल पारख, गणेशमल बंब यांच्याविरूद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.

माझा संबंध नाही : देशमुख

या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, दोंडाईचात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याशी माझा दुरानव्ये संबंध नाही. मी या आधीच दोंडाईचा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीच्या विरोधात माझी बेअब्रू केल्याची तक्रार दाखल केली आहे. मी जमिनीचा व्यवहार ज्या व्यक्तीशी केला ती व्यक्ती आणि फिर्यादीमध्ये व्यवहार बिनसला आहे. यात माझा कुठेही संबंध येत नाही.

land purchase and sale law Fraud case
Dhule Crime News : ATMची हेराफेरी करणारी टोळी सांगवी पोलिसांकडून गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.