Girish Mahajan : मृत महिलांच्या वारसांना वाढीव मदत; पालकमंत्री महाजनांची संवेदनशीलता

Girish Mahajan
Girish Mahajanesakal
Updated on

Girish Mahajan : जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन सेवाभावी कार्यामुळेही परिचित आहे. त्यात दुर्धर आजाराने जर्जर रुग्ण असो की रस्त्यावर अपघातात झालेला जखमी, ते संवेदनशीलपणे प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात.

त्यांच्याच प्रयत्नामुळे वासखेडी (ता. साक्री) येथील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून लाखाऐवजी पाच लाख रुपये मंजुरीचे निर्देश दिले आहेत. (by girish mahajan follow up to Directed approval of Rs 5 lakh to To deceased at Vaskhedi dhule news)

वासखेडी येथील एका स्थानिक कारखान्यास १८ एप्रिलला आग लागून त्या ठिकाणी पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत मृत पावलेल्या महिलांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे प्रत्येकी एक लाख याप्रमाणे एकूण पाच लाख निधी १८ मेच्या पत्रान्वये मंजूर करण्यात आला होता.

परंतु, मृत महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या घराचा चरितार्थ चालविण्यासाठी त्या कारखान्यात मजुरीने काम करीत होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girish Mahajan
Inspirational News : बालमजुरी रोखण्यासाठी 'ते' करतायत दुचाकीने प्रवास; कापले 7500 किलोमीटर अंतर

ही बाब पालकमंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणली. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना माहिती दिली होती.

त्याची दखल घेत पालकमंत्री महाजन यांनी पत्रव्यवहाराद्वारे पाठपुराव्यातून पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांचा सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानुसार विशेष बाब म्हणून या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

Girish Mahajan
Girish Mahajan : प्राथमिक शिक्षक बदली धोरणामध्ये दीर्घकालीन उपाययोजना करणार - गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.