Dhule Crime News : जिल्ह्यात नाकाबंदी; ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात मोहीम

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशाने जिल्ह्यात दोन दिवस नाकाबंदी व ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हविरोधात मोहीम राबविण्यात आली.
crime
crime esakal
Updated on

Dhule News : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशाने जिल्ह्यात दोन दिवस नाकाबंदी व ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हविरोधात मोहीम राबविण्यात आली. यात २५५ जणांवर कारवाई झाली. सुमारे ६४ लाखांवर दंडही वसूल करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशाने पोलिस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश देत जिल्ह्यात ३१ जानेवारीला रात्री आठ ते १ फेब्रुवारी रात्री साडेबारादरम्यान हे अभियान राबविण्यात आले. (campaign against blockade and drunk and driving was implemented in dhule district news)

नाकाबंदी व डंक ड्राइव्हविरोधातील या मोहिमेत फरारी व पाहिजे असलेल्या संशयितांना अटक करणे, अवैध शस्त्रांवर कारवाई करणे, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रिशीटर तपासणे, हद्दीतील हॉटेल, लॉजेस, धाबे व गुन्हेगारी वस्त्या तपासणे.

मोटार व्हेइकल केसेस, ड्रंक अन्ड ड्राइव्ह केसेस करण्यासाठी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यासह वॉरंट बजावणे व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

crime
Mumbai Crime: जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

या मोहिमेसाठी २९ पोलिस अधिकारी, १०० पोलिस अंमलदारांनी २३ ठिकाणी नाकाबंदी केली. यात ९१३ वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंक ॲन्ड ड्राइव्हविरोधात ३२ गुन्हे नोंदविले. मोटार वाहन कायद्यान्वये २०६ जणांवर कारवाई करून ५१ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दारूबंदीच्या चार गुन्ह्यांतून पाच हजार ९०० रुपये, जुगाराचे १३ गुन्हे दाखल करून सहा हजार ९२५ रुपये दंड वसूल केला. या मोहिमेत एकूण ६४ हजार ४२५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

crime
Jalna Crime : वाढदिवसाच्या पार्टीत एकाचा खून ; जालना शहरात जुन्या वादातून घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.