Dhule Crime : फियाट कारमधून मद्यतस्करी; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi and team of Pimpalner Police Station along with confiscated goods preventing the smuggling of liquor from cars.
Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi and team of Pimpalner Police Station along with confiscated goods preventing the smuggling of liquor from cars. esakal
Updated on

Dhule Crime : पिंपळनेर-नवापूर (ता. साक्री) रस्त्यावर फियाट कारमधून होणारी मद्यतस्करी पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी सातच्या सुमारास सापळा रचून रोखली.

एक लाखाची कार व ३५ हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. (car worth lakhs and 35000 domestic and foreign liquor stocks were seized by police from fiat car dhule crime news)

पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरून फियाट कार (एमएच ०५, एजे ७५७९)मधून देशी-विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने मंगळवारी सकाळी सहापासून उमरपाटा (ता. साक्री) गावाजवळ सापळा लावला. संशयित कारला अडवून तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत देशी-विदेशी मद्यासह बिअरचा साठा आढळून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi and team of Pimpalner Police Station along with confiscated goods preventing the smuggling of liquor from cars.
Crime News: मुलीशी लग्न करायचं होतं! लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली अन्...

त्यात १३ हजार ४४० रुपयांचे दारूचे चार बॉक्स, १५ हजार ३६० रुपयांचे विदेशी मद्याचे दोन बॉक्स, सहा हजार २४० रुपयांची बिअर आदी मद्यसाठा होता.

दरम्यान, पोलिसांनी या मद्यसाठ्यासह एक लाख रुपये किमतीची कार असा एकूण एक लाख ३५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक सूरज सुदाम वळवी (रा. वार्सा, ता. साक्री) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi and team of Pimpalner Police Station along with confiscated goods preventing the smuggling of liquor from cars.
Nagpur Crime: तरुणीला भेटण्यासाठी बोलावून दोन नराधमांचा सामूहिक अत्याचार; आरोपींना न्यायालयीन कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.