Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा

Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा
Updated on

Dhule Crime News : आनंदखेडे (ता. धुळे) येथे शासनाच्या विनापरवानगीने आपल्या दैवताचा पुतळा बसविणाऱ्या, तसेच जमाव जमवून पोलिसांना धक्काबुक्की करणे, वाहनांवर दगडफेक व एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्या प्रकरणी संशयित दहा जणांविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. (Case against 10 people in statue case dhule crime news)

आनंदखेडे येथे विनापरवानगी पुतळा उभारून पोलिसांशी हुज्जत घालणे दहा जणांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी सुरेश पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आनंदखेडा येथील सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवानगीने पुतळा उभारण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली.

त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत संरक्षणाअभावी पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित पुरुषोत्तम दिलीप मोरे, मंगा भगवान मोरे, अर्जुन भिवसन मोरे, भय्या उखडू मोरे, श्रावण मोरे, रवींद्र रामचंद्र भिल, दासभाऊ मोरे, सुनील मोरे व त्याचा भाऊ, प्रवीण भिल आदींनी पोलिसांना मज्जाव केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा
Crime News : तरूणावर गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद; तिसरी गोळी अडकल्याने आकाश बचावला

जमावाने पोलिस वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांना धक्काबुक्की करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार आहे. दरम्यान, पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत सुरक्षितस्थळी ठेवला. शासनाची परवानगी घेऊन पुतळा स्थापन करावा, अशी अपेक्षाही पोलिसांनी जमावापुढे व्यक्त केली.

तसेच जमावाने नंतर धुळे तालुका पोलिस ठाण्याजवळ येत रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. या घटनांमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांनी संशयित पुरूषोत्तम मोरे, मंगा मोरे, प्रवीण भिल याला अटक केली आहे.

Dhule Crime News : आनंदखेड्यात पोलिसांना धक्काबुक्की; पुतळा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा
Nashik Tehsildar Bribe Crime : तहसील प्रशासन आता सातच्या आत घरात! लाच प्रकरणाच्या दणक्याचा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()