Dhule Crime News : खोटे जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी अक्कडसेच्या उपसरपंचांवर गुन्हा

fake document
fake document esakal
Updated on

Dhule Crime News :अक्कडसे (ता. शिंदखेडा)च्या उपसरपंच खटाबाई कोळी अनुसूचित जमाती या प्रवर्गातून सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याची फसवणूक करून ते प्राप्त केल्या प्रकरणी शिंदखेडा येथील निवासी नायब तहसीलदार शारदा बागले यांनी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून उपसरपंच कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.(Case against Akkadase sub-sarpanch of fake caste validity certificate dhule news)

अक्कडसेच्या उपसरपंच खटाबाई गोपीचंद कोळी पूर्वाश्रमीच्या खटाबाई भिका चव्हाण यांच्याविरोधात शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास रामदास कोळी यांनी नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रारी दाखल केली होती.

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठी खटाबाई कोळी यांनी निवडणुकीत राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र बनावट व बोगस दाखल केले आहे, अशी तक्रार केली होती.

fake document
Dhule Crime: दूध भेसळ नियंत्रण समितीची धुळे शहर, साक्रीत कारवाई; 200 लिटर भेसळदूध नष्ट,गुन्हा दाखल

या तक्रारीवरून प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यपद धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबरला अपात्र घोषित केले होते.

श्रीमती कोळी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिंदखेडा निवासी नायब तहसीलदार शारदा बागले यांना प्राधिकृत केल्यावरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात उपसरपंच कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

fake document
Dhule Crime News : वाळूमाफियावर ‘महिला’ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कारवाई; वाळूमाफियांनी ट्रॅक्टर पळविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.