Dhule Crime News : साक्रीत दरोड्यासह तरुणीचे अपहरण प्रकरण; इंदूरजवळून 2 संशयित ताब्यात

Awkward material in a house in a robbery.
Awkward material in a house in a robbery.esakal
Updated on

Dhule Crime News : सशस्त्र दरोडा आणि त्यात तरुणीचे अपहरण अशा खळबळजनक, अनाकलनीय घटनेमुळे अवघ्या राज्याचे लक्ष साक्रीने (जि. धुळे) वेधले आहे. त्यामुळे तपासाकडे पोलिस महासंचालकांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.

ही जबाबदारी पेलत जिल्हा पोलिस प्रशासनाने भक्कम माहिती संकलन व पुराव्याच्या आधारे तपासाला गती दिली आहे. त्यात इंदूरजवळून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याने या घटनेची उकल होण्यास पोलिसांना मदत झाली आहे.(case of abduction of young woman with robbery in house dhule crime news)

येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वतीनगरात सशस्त्र दरोडा व त्यात तरुणीच्या अपहरणाची घटना घडली. या प्रकरणी पोलिस शोधपथकाने घटनेच्या चौथ्या दिवशी दोन संशयितांना इंदूर (मध्य प्रदेश)जवळील एका गावातून ताब्यात घेतल्याचे माहिती असून, या गुन्ह्यातील इको कार व बोलेरो अशी दोन वाहनेदेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सरस्वतीनगरात शनिवारी (ता. २४) ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या घरी रात्री अकराच्या सुमारास काही दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. ज्योत्स्ना पाटील यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सुमारे ८८ हजार ५०० किमतीचे दागिने हिसकावले. तसेच त्यांच्या २३ वर्षीय भाचीला घेऊन पाच ते सहा दरोडेखोर पसार झाले होते. दरोड्यासोबतच तरुणीच्या अपहरणामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.

इंदूरजवळून ताब्यात

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जलद तपास करत चोवीस तासांत अपहृत तरुणीला सेंधवा (मध्य प्रदेश) येथून सुखरूप ताब्यात घेतले आणि साक्रीत परत आणले. मात्र, या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या प्रकरणात अनेक प्रकारची संदिग्धता निर्माण होत असल्याने विविध शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली होती.

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सात पथके सक्रिय करण्यात आली. शोध सुरू असताना साक्री पोलिसांच्या एका पथकाला मंगळवारी (ता. २८) इंदूरजवळ एका गावातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात यश आल्याचे सूत्रांकडून समजले.

Awkward material in a house in a robbery.
Dhule Crime News :स्क्रॅपचा अवैध व्यवसाय; मुंबई-आग्रा महामार्गावरील 20 दुकानमालकांवर गुन्हा

यातील नाशिकचा एक तरुण मुख्य संशयित असून, दुसरा वाहनचालक आहे. तसेच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने इको कार व बोलेरो पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले. ताब्यातील दोघे संशयित चौकशीत काय जाबजबाब देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तरुणीचे असहकार्याचे धोरण

दरोडा प्रकरणातील अपहृत तरुणीला सुखरूपपणे साक्रीत आणण्यात पोलिसांना यश आले, मात्र तपासात तिने असहकार्याचे धोरण अवलंबिल्याने घटनेबाबत संदिग्धता निर्माण होताना दिसते आहे. ती एका मेडिकल दुकानात कामाला आहे. तिच्या मोबाईलद्वारे पोलिसांना बऱ्याच गोष्टींचे धागेदोरे उलगडता आले आहेत.

तिच्या जाबजबाबावर या घटनेचे बरेच मर्म अवलंबून आहे. तिचा जबाब आणि घडलेली घटना यात साम्य आढळले तर बऱ्याच बाबींचा उलगडा होऊ शकेल, अन्यथा अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण होऊन त्याला तोंड देणे संशयितांना अडचणीचे ठरू शकते, असे मत जनमानसातून व्यक्त होत आहे.

Awkward material in a house in a robbery.
Dhule Crime News: तरूणाला मुलींसमोर रिल बनविणे पडले महागात! बसस्थानकात पोलिसांनी घडवली अद्दल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.