Nandurbar Crime News : तत्कालीन पोलिस निरीक्षकाविरुद्ध अत्याचार व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
त्यांच्यावर आधीच येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असताना त्या गुन्ह्यात अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महिलेने पुरवणी जबाब दिल्याने संबंधित गुन्ह्याची कलमे वाढविण्यात आली आहेत. (case of torture atrocity has registered against police inspector nandurbar news)
तळोदा पोलिस ठाण्यात नितीन सुकदेव चव्हाण यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा महिलेने दाखल केला होता. मात्र फिर्यादी असलेल्या महिलेने पुन्हा १४ ऑगस्टला तळोदा पोलिस ठाण्यात हजर होऊन पुरवणी जबाब नोंदविला होता.
त्या जबाबात नितीन चव्हाण यांनी त्यांची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांनी गर्भपात करावा म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. धुळे येथे घरी असताना जातिवाचक शिवीगाळ केली, असे पुरवणी जबाबात नमूद केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सदर गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड विधान कलम ३७६, २९४, ३४ यांच्यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम १९८९ चे अधिनियम २०१५ नुसार वाढीव कलम लावण्यात आली आहेत.
दुसरीकडे या गुन्ह्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये कलम वाढीव करण्यात आल्याने सदर गुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.