Nandurbar News : सार्वजनिक जागेवर फटाके विक्रीचा स्टॉल लावल्याने अक्कलकुवा पोलिसांकडून येथील फटाके विक्रते नीलेश मराठे (३०) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (case registered due to setting up fire cracker stall in public place nandurbar news)
सणासुदीच्या काळात हंगामी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत घेऊन गुन्हे दाखल करणे आणि बारमाही अवैध व्यवसाय करणाऱ्यांना खुली सूट असते.
मग कायदा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच असतो का असा प्रश्न अक्कलकुवा तालुक्यातील दुकानदारांकडून उपस्थित करीत आपली नाराजी व्यक्त केली.
दिवाळीनिमित्त लहान मुलांसह मोठ्यांचे आकर्षण असलेले फटाके बाजारपेठेत विक्रीसाठी आले. फटाके विक्रीची छोटेमोठे स्टॉल शहरातील मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठांत व गल्लोगल्ली सजू लागले होते;
मात्र रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी उभे राहणाऱ्या या स्टॉलमुळे अग्नी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर धरून अक्कलकुवा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्री करणाऱ्या नीलेश मराठे या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यातील फटाके विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.