Dhule Crime News : अपघाताचे कारण देत ऑइल विक्री; टँकरचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

crime
crime esakal
Updated on

Dhule Crime News : भटिंडा (पंजाब) येथून कडी (गुजरात) येथे एका कंपनीत पोचविण्यासाठी दिलेले ऑइल टँकरचालकाने रस्त्यातच विक्री केल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे टँकर उलटल्याचे सांगत खोटी कागदपत्रे करून चालकाने ही लबाडी केली.

सुमारे सात महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने चालकासह तिघांविरुद्ध फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल झाला.( case was filed against oil sales tanker driver and three others dhule crime news)

भटिंडा (पंजाब) येथून प्रवीण जिंदाल यांनी कडी (गुजरात) येथील अदानी बिलमार लि. येथे ऑइल पोचविण्यासाठी दिले. हे ऑइल वाहनातून घेऊन जाताना वाहन उलटल्याचे भासवून तशी खोटी कागदपत्रे वाहनचालक महेंद्रसिंग हरीशसिंग मखवाना (रा. रवीनगर, पाटण, गुजरात) याने सुरपान (ता. साक्री) गावाजवळ परस्पर विकले.

ऑइलची किंमत ३२ लाख ६५ हजार ७६३ रुपये एवढी होती. हा प्रकार १४ ते २१ मार्च २०२३ दरम्यान घडला. मात्र, या प्रकारात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने श्री. जिंदाल यांनी चौकशी केली. त्यातून वाहनचालकाची लबाडी उघड झाली.

crime
Dhule Crime News : वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल; 2 झाडांची बेकायदा कत्तल

या चोरीत वाहनचालकाला आणखी दोघांनी सहकार्य केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. श्री. जिंदाल यांच्या तक्रारीवरून साक्री पोलिसांनी वाहनचालक महेंद्रसिंग मखवाना, ट्रान्स्पोर्टचालक मौलिककुमार नटवरलाल व्यास व शशिकांत राममनोहर गुप्ता (दोघे रा. गुजरात) यांच्याविरुद्ध फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
Dhule Crime News : लाखाची रोकड, दागिने घेऊन वधू गायब; तरुणाची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.