Dhule News : धुळे पोलिसांवर गुरे हाकण्याची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ‘खो’

Dhule News
Dhule News esakal
Updated on

धुळे : शहरात आठवड्यानंतर पाणीपुरवठा, ठिकठिकाणी खड्डे व रस्त्यांची दैन्यावस्था, दुतर्फा वाढते अतिक्रमण, धुळीचे साम्राज्य, स्वच्छतेचे तीनतेरा, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद आणि यापाठोपाठ मोकाट जनावरांचा ठिकठिकाणी मुक्त संचार, अशा ज्वलंत समस्यांमधून धुळेकरांची अद्याप सुटका झालेली नाही. नागरी तक्रारींनतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मोकाट जनावरांचा प्रश्‍न सोडविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्याला ‘खो’ दिल्याने मोकाट जनावरे पुन्हा बेडरपणे रस्त्यावर आली आहेत.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

महापालिकेवर टीकेची झोड आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने काही कर्मचारी पथकांची नियुक्ती करत पशुपालकांवर दंडात्मक कारवाई, तसेच मोकाट जनावरे गोशाळेत जमा करण्याची मोहीम हाती घेतली होती. नव्याचे नऊ दिवस महापालिकेने कारवाईचा आव आणला. आता पुन्हा मोकाट जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

मोकाट जनावरांचा ठिकठिकाणी ठिय्या, मुक्त संचार सुरू झाला आहे. महापालिका प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे ओळखून मोकाट जनावरांनी शुक्रवारी (ता. १६) महापालिका प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. विशेष म्हणजे वर्दळीच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या आणि मुक्त संचार असल्याने महापालिका ही समस्या सोडविण्यात असक्षम ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. यातही वर्दळीच्या कमलबाई शाळा चौकात तर पोलिस वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यालाच जनावरे हटविण्याची वेळ आली.

Dhule News
चक्क पोलिसांनी दिली स्मशानभूमीला लाकडे भेट; वाचा नेमकं काय घडलं

कुठलेही नियंत्रण नाही

महापालिकेचे शहरातील समस्या निवारणावर नियंत्रण राहिले नसल्याचे विविध तक्रारींवरून दिसून येते. यात भररस्त्यात ठिय्या मांडणाऱ्या, मुक्त संचार करणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. ठिकठिकाणी दुभाजकांजवळ मोकाट जनावरे व कुत्र्यांचा ठिय्या असतो.

दुभाजक तर कुत्र्यांच्या निवासाचे हक्काचे स्थान झाल्याचे दिसते. कुत्रा केव्हा दुभाजकावरून उडी मारेल याचा नेम नसल्याने वाहनधारक जीव मुठीत ठेवूनच असतात. कुत्र्यांचा प्रश्‍न मार्गी लागलेला नसताना भररस्त्यांवर जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कठोर कारवाईची मागणी होत असते. ठेकेदारांची बिले काढण्यात अधिक रस असलेल्या महापालिकेला कोंडवाड्याचा प्रश्‍न अद्याप मार्गी लावता आलेला नाही.

या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात महापालिका ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच धुळेकर साशंकता व्यक्त करू लागले आहेत. रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्‍न वेळोवेळी ऐरणीवर येत असतो. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असते. तरीही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रोष व्यक्त होत आहे.

Dhule News
Dhule Crime News : कारसह पावणेतीन लाखांचा देशी दारूसाठा साक्रीतून जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()