Sakal NIE : वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभर ‘सकाळ एनआयई’; केंद्रप्रमुख किशोर रायते यांच्याकडून शाळांना पन्नास अंक भेट

Sakal-NIE
Sakal-NIEesakal
Updated on

Sakal NIE : मोबाईलच्या विळख्यातून मुलांची सुटका करण्यासाठी, विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीची पुनश्च आवड लावण्याकरिता, सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘सकाळ साप्ताहिक एनआयई’ सुरू केले. (Center head Kishor Raite gifted 50 sakal nie newspaper to school nandurbar news)

या विद्यार्थ्यांना वाचनाचा बहुमूल्य खजिना उपलब्ध व्हावा म्हणून केंद्रप्रमुख किशोर रायते यांनी वडिलांच्या स्मरणार्थ ५० अंकांची वर्षभराची वर्गणी भरून जिल्हा परिषदेच्या खेकडा व करंजी खुर्द या दोन केंद्रांतील प्रत्येक शाळेला (सर्व व्यवस्थापन) एक याप्रमाणे अंक सुरू करून अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

नवापूर तालुक्यातील खेकडा व करंजी खुर्द केंद्रप्रमुख रायते यांनी त्यांचे वडील (कै.) आत्माराम भिलाजी रायते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दर आठवड्याला शुक्रवारी प्रकाशित होणारे ‘सकाळ एनआयई’ साप्ताहिक वर्षभराकरिता विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी देत आहेत.

सकाळ एनआयई साप्ताहिक दर शुक्रवारी प्रसिद्ध होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal-NIE
Inspirational News: सोनवणे दांपत्य भागवतात निराधारांची भूक! माणुसकीच्या नात्याने मदतीचा प्रयत्न

त्यात लहान मुलांना उपयुक्त माहिती, हसतखेळत वाचन व मुलांच्या लेखनकौशल्यात वाढ करण्यासाठी, विविध वाचनीय व बुद्धिमत्तेला चालना देणारी सदरे, शब्दकोडी आणि वैविध्यपूर्ण माहितीचा खजिना आहे.

सकाळ एनआयईच्या वाचनामुळे व नित्य अध्यापनातून मुलांची बौद्धिक क्षमता, गुणवत्तावाढीस मदत होणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेतून शेवटच्या इयत्तेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास वर्षअखेरीस प्रेरणा मिळावी म्हणून एक कंपासपेटी भेट देण्यात येईल.

"माझे वडील नित्यनेमाने ‘सकाळ’ वृत्तपत्र वाचत असत. सकाळच्या वाचनाने त्यांचा दिनक्रम सुरू होई. ‘सकाळ एनआयई’मध्ये शब्दकोडी आणि वैविध्यपूर्ण माहितीचा खजिना असल्याने तो विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला. माझ्या वडिलांना हीच खरी श्रद्धांजली असेल." -किशोर आत्माराम रायते, केंद्रप्रमुख खेकडा व करंजी खुर्द (ता. नवापूर)

Sakal-NIE
Inspirational Video : संकटांना कवटाळून बसू नका, इच्छाशक्ती ठेवा! एक पाय नसतानाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.