Dhule News : मध्यवर्ती बसस्थानक कात टाकणार; प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

Shiv Sena District Chief Manoj More while giving a statement to Chief Minister Eknath Shinde
Shiv Sena District Chief Manoj More while giving a statement to Chief Minister Eknath Shinde esakal
Updated on

Dhule News : राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन महामंडळाच्या एमडींना प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला. त्यामुळे दुरवस्था झालेले धुळे बसस्थानक लवकरच कात टाकणार, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी दिली. (Central Bus Stand will soon be reconstructed dhule news)

धुळे शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकात गुजरात-मध्य प्रदेश राज्यांना जोडणारे मोठे मुख्य बसस्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ आहे. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी धुळे बसस्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असल्याने प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे ठिकाण आहे. प्रवाशांसह बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सर्वांत मोठी समस्या येथील रस्त्यांची आहे.

प्रवासी व बसची संख्या पाहता सद्यःस्थितीतील बसस्थानक अत्यंत गैरसोयीचे झाले असून, बसस्थानकाच्या इमारतीचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रवाशांना बसण्याची सोय नाही, स्वच्छतागृह, इतर सोयी-सुविधा, कर्मचारी विश्रांतिगृह, पोलिस चौकी, बायपास बस केंद्र, चौकशी केंद्र, पार्किंग व्यवस्थेची दुरवस्था आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Shiv Sena District Chief Manoj More while giving a statement to Chief Minister Eknath Shinde
Dhule News : कुंभारेला 2 वर्षांची सक्तमजुरी; न्या. पठारे यांचा निकाल

प्रवाशांना पिण्याची पाण्याची सोय नाही, असे श्री. मोरे यांनी म्हटले आहे. या सर्व समस्यांबाबत आपल्यासह शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले, चर्चा केली.

धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहन मंडळाचे एम.डी. यांना बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लवकरच धुळे मध्यवर्ती बसस्थानक कात टाकेल, आधुनिक सुविधा असलेले बसस्थानक साकारेल, असा विश्‍वास श्री. मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केला आहे.

Shiv Sena District Chief Manoj More while giving a statement to Chief Minister Eknath Shinde
Dhule News : उष्माघातप्रवण जिल्ह्यात धुळ्याचा समावेश; दक्षतेची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.