Dhule News : मनमाड-दादर-अमृतसर एक्स्प्रेसला हिरवा कंदील; पूर्ववत धुळे ते दादर प्रवासामुळे खुशी

Express
Expressesakal
Updated on

धुळे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्रीय रेल्वे व्यवस्थापनाने मनमाड-दादर-अमृतसर एक्स्प्रेसची पूर्वापार चालत आलेली धुळे ते दादरपर्यंतची रेल्वेसेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर उमटला. (central govt agrees for restarting Manmad Dadar Amritsar Express dhule news)

ही सेवा बंद झाल्याने मंत्रालयीन कामकाज, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रामुख्याने रुग्णांना मोठा अडसर निर्माण झाला. ही सेवा पूर्ववत होण्यासाठी विविध पक्ष-संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. यात केंद्रीय माजी मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुराव्यातून ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळविला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

धुळे ते मुंबई, अशा स्वतंत्र रेल्वेची अनेक वर्षांपासून मागणी होती. यात मुंबई बोगीऐवजी स्वतंत्र रेल्वेसाठी प्रवाशांप्रमाणे खासदार डॉ. भामरे हेही आग्रही होते. कोरोनाच्या लॉकडाउन काळात बंद झालेली मुंबई बोगीची सुविधा धुळ्याकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरली.

त्यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई बोगीसाठी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. याआधारे त्यांनी केंद्राकडे धुळे-मुंबई या स्वतंत्र रेल्वेची मागणी लावून धरली. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडून तयार करून घेतला. त्यानुसार धुळे-मनमाड-दादर, अशी रेल्वे सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दिला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Express
Dhule News : अन्य मार्गाने मिरवणुकांना मनाई; पोलिस अधीक्षकांचा आदेश

धुळेकरांची स्वप्नपूर्ती

खासदार डॉ. भामरे यांनी पाठपुराव्यातून धुळे रेल्वेस्थानकातून धुळे-मुंबई ही स्वतंत्र रेल्वे सुरू होण्यास हिरवा कंदील मिळविल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लवकरच ही रेल्वे सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. धुळे ते मनमाड या लोहमार्गावर अनेक तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रश्न भिजत पडला होता.

यात मुंबई-दादर प्रवासात धुळेकरांसाठी असलेली एक बोगी बंद झाली होती. एका बोगीतून अधिकाधिक प्रवाशांना जाणे व परतीचा प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे अनेक डबे असलेल्या थेट स्वतंत्र रेल्वेचा विचार पुढे आला.

तो मूर्त स्वरूपात आणण्यास खासदारांना यश मिळाले. मागणी मार्गी लागण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि भुसावळ येथे रेल्वे अधिकारी आणि खासदार डॉ. भामरे यांच्यात वेळोवेळी संयुक्त बैठका झाल्या. मागणीपूर्ती झाल्याने खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनकुमार वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री दानवे आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Express
Dhule News : जमीन तेवढीच, लोकसंख्या वाढली... वनहक्क व पेसा समन्वय समितीचा जोरदार युक्तिवाद

तूर्त आठवड्यातून तीन दिवस सेवा

खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले, की धुळे रेल्वेस्थानक ते दादर (मुंबई) स्थानकापर्यंत रेल्वेसेवेस मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मनमाड-दादर-अमृतसर एक्स्प्रेस आता धुळे रेल्वेस्थानकातून सुटेल. धुळे-मनमाड-दादर असा तिचा प्रवास असेल.

आठवड्यातून तीन दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतल्यावर आणि अपेक्षित प्रतिसादानंतर ही रेल्वे रोज धुळेकरांच्या सेवेत राहील. सकाळी साडेसहाला येथून निघणारी ही रेल्वे दुपारी दीडच्या सुमारास दादरला पोचेल आणि परतीत दुपारी साडेचारला निघेल व रात्री अकराला धुळे स्थानकात पोचेल.

Express
Nandurbar News : फळबाग-फुलशेती योजनेचा लाभ घ्या; कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()