Dhule News : धुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांमधील धोकादायक व जीर्ण सुमारे १०८ वर्गखोल्या निर्लेखनाचा आदेश सीईओ शुभम गुप्ता यांनी दिला आहे. वर्गखोल्या पाडकामास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालाच्या अधिन राहून नुकतीच ही मान्यता दिली गेली आहे.
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी धोकादायक वर्गखोल्या निर्लेखित करण्याचा अहवाल दिल्याने सीईओ गुप्ता यांनी त्यासंबंधी कार्यवाहीचे आदेश दिले. (CEO Shubham Gupta ordered write off about 108 dangerous dilapidated classrooms in 35 ZP schools in Dhule taluka news)
यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनूर, महाल रायबट नेर, सुकवड-विश्वनाथ, आमदड, अंचाडेतांडा, गरताड, धाडर, नंदाळे बुद्रुक, हेंकळवाडी (सडगाव), पिंप्री, आर्वी, कन्या शाळा मोघण क्रमांक २, सुट्रेपाडा, मोरदड तांडा, पाडळदे (प्रत्येकी एक वर्गखोली), तसेच अंचाडे, वडजाई, जुन्नेर, मळाणे.
भिरडाणे (प्रत्येकी दोन वर्गखोल्या), नवलाणे- चार, कुंडाणे-वरखेडी- पाच, वरखेडे- चार, चिंचखेडे- नऊ, मोराणे प्र.ल.- पाच, अंबोडे- चार, शिरूड कन्या शाळा-आठ, प्राथमिक शाळा शिरूड मुले- १२, शिरडाणे (प्र.डां.)- चार, काळखेडा- पाच, वार- चार या शाळेतील वर्गखोल्या निर्लेखित करण्यात येतील.
संरक्षक भिंतींचा आसरा
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांना संरक्षण भिंती नाहीत. त्यामुळे शाळांभोवती अतिक्रमण वाढते आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या समग्र शिक्षांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना आयटीआय लिमिटेड कंपनीमार्फत संरक्षण भिंत बांधून देण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील एक हजार ५५४ शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. त्यात येथील जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या काही इमारतींची अवस्था दयनीय म्हणून पाहिली जाते. अनेक शाळांना संरक्षक भिंती नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी मधल्या सुटीत, शाळा भरण्याआधी शालेय आवारात वावरत असतात.
शाळेस संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना क्रीडांगणात मुक्तपणे खेळता येत नाही, मोकाट जनावरांच्या त्रासापासून शाळा परिसरात अतिक्रमण झाल्याचे चित्र बहुतेक शाळांमध्ये पाहावयास मिळते. त्यामुळे शाळांना संरक्षक भिंत उभारणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला होता.
जिल्ह्यात शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळांना संरक्षण भिंत बांधल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित असतील. त्यांच्या एकाग्रतेवर, अभ्यासावर लक्ष केंद्रित असेल. तसेच शाळेभवतालचा परिसर सुशोभित होईल. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ शाळांना संरक्षक भिंती उभारण्यासाठी उपक्रम राबविला जात असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे पंचायत समितीच्या सर्व गट साधन केंद्रांना कळविले आहे.
सुरक्षारक्षकांसाठी अनुदान
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवारत सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा तिढा सुटला आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दीड कोटीचे अनुदान वर्ग केले आहे.
त्यामुळे सुरक्षारक्षकांचे दहा महिन्यांपासून रखडलेला वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बॅकसन्स या त्रयस्थ संस्थेतर्फे सुरक्षारक्षकांची नियुक्ती झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.