Nandurbar Crime News : धूमस्टाईल महिलांची चेन लांबविणाऱ्या टोळीला अटक

Car and valuables seized from the gang extending the gold chain.
Car and valuables seized from the gang extending the gold chain. esakal
Updated on

Nandurbar Crime News : मागील काही दिवसांपासून नंदुरबार, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते.

नंदुरबार शहरातील उपनगर परिसरातील गिरीविहार गेट भागात एकापाठोपाठ दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यामुळे धूमस्टाईल सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने अखेर टोळीला पकडण्यात यश मिळविले आहे. (chain snatcher gang of jalgaon arrested nandurbar news)

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे व कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला व जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे बैठकीत दिले होते.

११ जुलैला दुपारी एकच्या सुमारास रजनी सुधीर पाटील (वय ५६, रा. जनता पार्क, लिंक रोड, नवापूर) यांच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्तींनी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत जबरीने ओढून नेल्याने त्यांनी नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस अंमलदार तत्काळ घटनास्थळी रवाना झाले व जिल्ह्यातील सर्व ठिकाणी व नवापूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या गुजरातमधील पोलिस ठाण्यांनादेखील नाकाबंदी लावण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Car and valuables seized from the gang extending the gold chain.
Jalgaon Crime News : लग्नानंतर 3 महिन्यात विवाहितेची आत्महत्या; पाचोरा येथील घटना

स्थानिक गुन्हे शाखेची व नवापूर पोलिस ठाण्याची पथके नवापूर ते विसरवाडी पोलिस ठाणे व नवापूर ते सोनगड (गुजरात राज्य) या मार्गावर गस्त, तसेच नाकाबंदी करीत असताना आरटीओ नाका नवापूर येथे एक संशयित वाहन सोनगड ते महाराष्ट्राकडे भरधाव येताना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने नाकाबंदी चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करून वाहन काही अंतरावर थांबविले. वाहनात अब्बास ईबाबत शेख (इराणी) (वय २०, रा. रजा टॉवरजवळ, पापानगर भुसावळ, ता. भुसावळ,जि. जळगाव), सादीक ईबाबत शेख (इराणी), सखी मोहम्मद खान (इराणी), (३४, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ), एक अल्पवयीन मुलगा तसेच वाहनचालक अनिल श्यामराव सोनवणे (४४, रा. अंजाळा, ता. यावल, जि. जळगाव) यांचा समावेश होता.

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचे वर्णन सोनसाखळी चोरीतील संशयितांशी मिळतेजुळते वाटल्याने अधिक विचारपूस केली. त्यांनी नवापूर शहरात जनता पार्क येथे त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने मोटारसायकलवर अब्बास शेख (इराणी) व एक अल्पवयीन मुलाने मिळून एका दुकानातील महिलेच्या गळ्यातून चेन ओरबाडून पळून गेल्याचे सांगितले.

Car and valuables seized from the gang extending the gold chain.
Chh. Sambhaji Nagar Crime : सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

वाहनाची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून ९० हजारांची २० ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ६७ हजार ५०० रुपयांची काळे मणी असलेली १५ ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत, ३२ हजार ५०० रुपयांचे पाच विविध कंपन्यांचे मोबाईल, पाच लाख रुपये किमतीची एक डिझायर कार (एमएच १९, सीयू ६४८९) या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) चोरीचे गुन्हे केल्याची सविस्तर माहिती दिली. सादिक ईबाबत शेख (इराणी) याच्याविरुद्ध जळगाव, बीड, बुलडाणा, अहमदनगर व मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असे ३२ गुन्हे, अब्बास अली ईबाबत अली याच्याविरुद्ध एक गुन्हा, सखी मोहम्मद इराणी याच्याविरुद्ध दोन गुन्हे, अल्पवयीन मुलाविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Car and valuables seized from the gang extending the gold chain.
Nandurbar Crime: बांधावरील झाडाच्या हिश्‍शाच्या वादातून लहान्याने केला मोठ्या भावाचा खून

तपास पथकाला बक्षीस

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाला जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले. गुन्ह्यातील एका फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यालादेखील बेड्या ठोकण्यात येतील, श्री. पाटील यांनी सांगितले.

कारवाई पथक

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलिस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, हेमंत सैंदाणे, पोलिस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली..

Car and valuables seized from the gang extending the gold chain.
Nandurbar Crime News : 2 वाहनांसह 45 लाख 70 हजारांचा मद्यसाठा हस्तगत; नंदुरबार शहर पोलिसांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.