Chandrashekhar Bawankule : सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केली आहेत. मुस्लिम महिलांना सहज दिला जाणारा घटस्फोट भाजप सरकारने रोखला. त्यामुळे मुस्लिम महिलांचा भाजपला पाठिंबा मिळत आहे.
वर्तमान स्थिती पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जनता पुन्हा भाजपला बहुमत देईल आणि पंतप्रधानपदी मोदी विराजमान होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ( Chandrashekhar Bawankule statement of Modi sitting as Prime Minister again dhule news)
भाजपच्या शहर-जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र अंपळकर यांची निवड करण्यात आली. नंतर काही काळातच त्यांच्यासह अंपळकर परिवाराने धुळे शहरातील चाळीसगाव रोडलगत मारुतीनगरात असलेली त्यांच्या मालकीची कोट्यवधी रुपये किमतीची जागा पक्ष कार्यालयासाठी देत असल्याचे जाहीर केले.
नंतर शनिवारी (ता. २५) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते भाजप कार्यालय उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. स्वतःची कोट्यवधींच्या किमतीची जागा पक्ष कार्यालयासाठी देणारे गजेंद्र अंपळकर एकमेव आहेत, असे सांगत त्यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शब्दसुमनांनी गौरव केला.
अयोध्येसाठी आवाहन
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर अयोध्येत साकारले जात आहे. लवकरच श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात धुळ्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे. त्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे व्यवस्था करतील, असेही श्री. बावनकुळे यांनी जाहीर केले.
गटबाजी रोखणार
आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षाला बूथवर थांबविण्यासाठी कार्यकर्ता मिळायला नको, अशा पद्धतीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने काम करावे, असे आवाहन श्री. बावनकुळे यांनी केले.
पक्षातील येथील गटबाजी रोखण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने ते अस्वस्थ दिसून आले. पक्ष कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.