कापडणे (जि. धुळे) : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. माध्यमिक शाळा खासगी असल्याने या भिंती आजही मरणासन्न यातना सहन करीत आहेत. मात्र जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या भिंती शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या संकल्पनेतून बोलू लागल्या आहेत. कलाशिक्षकांनी त्यांच्या कल्पकतेतून या भिंतींना जणू बोलके सजीत्व प्राप्त करून दिले आहे. आता जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या भिंतींनीही कात टाकावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Changed form of office from education officer Desale concept by wall paintings at kapadne Latest Dhule News)
सुंदर माझे कार्यालय अन् परिसर
शिक्षणाधिकारी मोहन देसले अॅक्टिव्ह शिक्षणाधिकारी आहेत. ते सुंदर माझे कार्यालय आणि परिसर ही संकल्पना राबवीत आहेत. त्यांनी कार्यालयाच्या संरक्षक भिंती बोलक्या केल्या आहेत. या भिंतींना बघितल्यानंतर मन रमत आहे. तेथील सूक्ष्म कलाकुसर बघितल्यानंतर ‘वा, काय बोलक्या भिंती आहेत!’ असे उद्गार सहज बाहेर पडतात.
यासाठी कलाशिक्षकांची लाखमोलाची मदत झाली आहे. गरताड येथील कलाशिक्षक अजय भदाणे, एकवीरादेवी माध्यमिक विद्यालयातील गणेश फुलपगारे, वेल्हाणेतील मनोहर अहिरे या शिक्षकांच्या कुंचल्यातून भिंती बोलक्या झाल्या आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी देसले, उपशिक्षणाधिकारी बागूल, शिक्षण विस्ताराधिकारी धिवरे, पवार आणि गिरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
माध्यमिकच्या भिंतीही व्हाव्यात बोलक्या
जिल्ह्यात प्रत्येक गावात माध्यमिक शाळा आहेत. मोठ्या गावात किमान दोन शाळा आहेत. विशेष म्हणजे कलाशिक्षकही आहेत. तरीही या शाळांच्या भिंती मरणासन्न यातना सहन करीत आहेत. सार्वजनिक भिंतींसम स्थिती आहे. या भिंतींनीही कात टाकावी, संस्थाचालकांनी लक्ष घालावे, शिक्षण विभागानेही तसा फतवा काढून, या भिंती बोलक्या करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील शाळांच्या संरक्षक भिंतीही बोलक्या होणे गरजेचे आहे. दरम्यान, अपवादात्मक शाळा सोडल्यास इतर सर्व शाळांच्या भिंती दयनीयच आहेत.
प्राथमिक शाळांच्या भिंती सर्वांगसुंदर
धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे अंतरंग आणि बाह्यांग आदर्शवत आहे. भिंती बोलक्या आहेतच, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्याही आहेत. निकुंभे येथील शिक्षकांनी गावातील घरांच्या भिंतीही अभ्यासयुक्त बोलक्या केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.