Dhule News: छत्रपती संभाजीराजे स्मारकाला विलंब; पुतळा समिती महापालिकेवर नाराज

Amita Patil watching Sankalp Chitra at Chhatrapati Sambhaji Park.
Amita Patil watching Sankalp Chitra at Chhatrapati Sambhaji Park.
Updated on

Dhule News: महापालिकेकडून दोन ते तीन वर्षांपासून लहान पुलाजवळील छत्रपती संभाजी उद्यानातील छत्रपती संभाजीराजे स्मारकाच्या कामाल विलंब केला जात आहे, असे सांगत अशा उदासीन कारभाराविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम यांनी सोमवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली. (Chhatrapati Sambhaji Raje memorial delayed dhule news)

समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव अर्जुन पाटील, अ‍ॅड. नितीन पाटील, दिनेश काळे, कोमल आभाळे, नामदेव मोरे, मनोज पवार, हृषीकेश पाटील, अकबर पिंजारी, किरण भालेराव, प्रदीप काळे आदी उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, की महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाच्या कामास मोगरी लागली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा बाराशे किलो वजनाचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे. मात्र, मनपाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे स्मारकाच्या लोकार्पणाला विलंब होत आहे.

परवानगी मिळाली

महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने स्मारकाचे उर्वरित बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा श्री. कदम आणि पदाधिकाऱ्यांनी दिला. छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारावा यासाठी छावा संघटनेतर्फे प्रथम आंदोलन झाले. यानंतर २ जुलै २०१५ ला महापालिकेने पुतळा उभारणीस परवानगी दिली. मग समितीची स्थापना झाली. पुतळा निर्माण समितीने मंत्रालयीन सर्व २१ परवानग्या मिळविल्या. तत्कालीन मनपा सत्ताधाऱ्यांनी २५ लाखांची तरतूद करून या कामाला चालना दिली.

Amita Patil watching Sankalp Chitra at Chhatrapati Sambhaji Park.
Dhule News : सातपुड्यातील हजारो लोकांना ‘गजनी’ने बनविले शाकाहारी; अंगावरील कपड्यांद्वारे संदेश

आंदोलनाचा पवित्रा

सत्तांतरानंतर भाजपचे तत्कालीन महापौर चंद्रकांत सोनार यांनी २१ लाखांची तरतूद करून कामाला चालना दिली. तसेच १६ जानेवारी २०२१ ला स्मारकाच्या कामाचे खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

पुतळा तयार होऊन सहा महिने झाले तरी मनपाकडून अपेक्षित प्रतिसाद दिला जात नाही. याकामी वेळोवेळी प्रशासनाकडे विनंती करण्यात आली. तरीही उद्यानातील चबुतरा उभारणीसह आवश्यक बांधकाम अपूर्ण आहे. तीन वर्षे उलटूनही काम पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे श्री. कदम म्हणाले.

महापौरांसह आयुक्तांकडून दखल

दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त अमिता दगडे-पाटील, अभियंता कैलास शिंदे यांनी स्मारकस्थळी कामाची पाहणी केली. काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित निधीचा प्रस्ताव तयार करून तो येत्या महापालिकेतील सभेत ठेवावा आणि मंजुरीनंतर महिन्याभरात काम मार्गी लावावे, अशी सूचना आयुक्तांनी यंत्रणेला दिली.

Amita Patil watching Sankalp Chitra at Chhatrapati Sambhaji Park.
Dhule News: करवंदला 62 एकरांवर साकारणार वृक्षराजी; शासनाचा हिरवा कंदील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()