Nandurbar News : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. १६) केले.(Chief Minister Eknath Shinde statement of create Maharashtra of everyone thoughts and dreams nandurbar news)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवसारख्या अभियानाच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्यासाठी सर्वांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून सुरू असलेले केंद्र सरकारचे काम आम्हाला प्रेरणा देत आहे.
राज्य शासनसुद्धा याच भूमिकेतून आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी काम करत आहे. आदिवासी बांधवांच्या संस्कृतीत आपल्या मातीचा गंध आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात प्रत्येकाने आदिवासी समाजाची जीवनशैली आणि वनसंवर्धनाबाबतची त्यांची जिद्द यापासून धडा घेण्याची गरज आहे.
आपली माती, जंगल, संस्कृती राखण्याचे काम आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून करत आहेत. त्यांना केवळ आपली संस्कृतीच जतन केली आहे, असं नव्हे, तर या जंगलातील निसर्गसंपदाही जतन केली. त्यांच्या योगदानामुळेच आज आम्ही समृद्ध वनसंपदा पाहू आणि अनुभवू शकतो.
आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य यासोबतच आदिवासी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट करणे अशा सर्व बाजूने शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची वाट दाखवणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या नावे राज्यातील आदिवासीबहुल १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवित आहोत.
एकूण ५ हजार कोटी रुपयांची ही योजना असून ६ हजार ८३८ किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून बांधले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे गुरुकुल असणाऱ्या आश्रमशाळांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातील २५० शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा आपल्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा करत असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथील घरकुल व स्मशानभूमींना जागा देण्यासाठी येणाऱ्या काळात नियोजन केले जाईल. तापी नदीवरून पाणीपुरवठा योजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासोबतच दुष्काळाच्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एका नजरेत जनजातीय गौरव दिवस
- राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्कडून आदिवासी भिलोरी भाषेत जनजातीय गौरव दिन व दिवाळीच्या शुभेच्छा
- आदिवासींचे अंतरंग या कॉफी टेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन -
- एकलव्य कुशल व आदिछात्रवृत्ती या पोर्टल्सचे लोकार्पण
- कार्यक्रमात राज्यातील विविध आदिवासी नृत्यकलांचे शानदार प्रदर्शन
-राज्यभरातील आदिवासी हस्तकला व आदिवासी खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन
- आदिवासी माहितीपट महोत्सवाचे विशेष आयोजन
- दिव्यांग आदिवासी क्रीडापटू दिलीप गावित यांना पाच लाखांचा प्रोत्साहनपर धनादेश
- रावलापाणी गावास साामूहिक वनहक्काचे वितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.