धडगाव (जि. नंदुरबार) : भूजगाव (ता. धडगाव) ग्रामपंचायतीत वेगवेगळे अभिनव प्रयोग नेहमीच राबविले जातात.
सध्या अशाच एका प्रयोगामुळे येथील ग्राम पंचायतीचा (Gram Panchayat) निर्णय गाजत असून, त्याचा सर्वत्र बोलबाला आहे. (Child marriage now banned in Bhujagaon Harankhuri Nandurbar News)
कारण, भूजगावमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील लग्नांसाठी ग्राम पंचायतीकडूनच ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतसमोर मोकळ्या मैदानात चक्क मंडप व ध्वनिक्षेपकही लावण्यात आला होता.
ग्रामस्थांना प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र माईक आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय होती. साधारणत: सहा तास चालेल्या ग्रामसभेत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.
त्यात विविध समित्यांची मंजुरी, वृक्षारोपण, रोजगार, कुपोषण, हातपंप दुरुस्ती, जलजीवन मिशन योजनेची आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.सर्व नागरिकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते.
स्पीकरद्वारे ग्रामसभेची माहिती
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा धडगाव तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवर अजेंडा वितरीत केला. गावाच्या व्हाटस्अप समुहावर संदेश पाठविण्यात आले. शिवाय पाडाविकास कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला निरोप दिला गेला.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
स्वतः सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ऑटोरिक्षावर लाऊड स्पीकरद्वारे प्रत्येक पाड्यापर्यंत जनजागृती केली. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला ग्रामसभेची तारीख, वेळ आणि ठिकाणाची माहिती दिली जात होती. शासकीय परिपत्रकानुसार आदल्या दिवशी महिलासभा आणि बालसभाही झाली.
असा आहे ठराव
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करतानाच हरणखुरी व भुजगाव बालविवाह बंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यानुसार लग्न पत्रिका छापताना मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे २१ वर्ष पूर्ण झाल्याचे नमुद करणे, वधू- वराच्या वयाचा पुरावा ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक राहील.
वयाचा पुरावा दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. पळून जाऊन लग्नाचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींच्या विरोधात ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल. बाल विवाह कायद्याने गुन्हा असल्याचा फलक गावाच्या मुख्य चौकात लावण्याबरोबरच ग्रामपंचायततर्फे जनजागृतीही करण्यात येईल.
ग्रामसभा ही गाव विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्वाची असते. परंतु, नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवताना दिसतात. हे गाव विकासासाठी धोक्याचे आहे. गावातील जनतेचा ग्रामसभेत आणि निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढावा, यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे गावाचे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहील. -अर्जुन पावरा, सरपंच, भूजगाव
मी अनेक वर्षापासून ग्रामसभेत सहभागी होत आहे. परंतु ग्रामसभेची माहिती अशी जाहिररित्या जनतेला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रामसभेत विकासात्मक, सकारात्मक आणि सर्व सर्वसमावेशक मुद्यांवर शांततेत चर्चा आणि ठराव मंजूर झाले. नव्याने निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उत्तमरित्या कारभार करत आहेत. उच्चशिक्षित असल्याचा हा परिणाम आहे, असे वाटते. -मोचाडा पावरा, ग्रामस्थ, हरणखुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.