Dhule Crime : शहरासह परिसरात काही दिवसांपासून एखाद्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकायची आणि बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करायची, असे भीतिदायक गुन्हे घडत होते. त्यामुळे पोलिसांचीही झोप उडाली होती.
अखेर आझादनगरच्या पोलिस पथकाने या टोळीतील तिघांना पकडले आणि त्यांना गजाआड केले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दहा हजारांच्या रोख बक्षिसातून आझादनगर पोलिस पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (Chilli powder gang arrested in dhule crime news)
काही दिवसांपासून ‘मिरचीपूड’ गँगने शहरासह परिसरात धुमाकूळ घातला होता. महामार्गावर किंवा अन्य वर्दळीच्या मार्गावर दुचाकीस्वार किंवा तत्सम प्रवाशाला अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकायची, बंदुकीचा धाक दाखवून रोकड, मोबाईल व दुचाकी, दागिने हिसकविण्याचे भीतिदायक प्रकार घडत होते.
नगाव, गरताड-तिखी फाटा, मोराणे शिवार आदी ठिकाणी अशा घटना घडल्या. त्यामुळे रात्री दुचाकी, तसेच इतर वाहनांनी जाणाऱ्यांमध्ये भीतिदायक वातावरण होते. असले गुन्हे रोखण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी यंत्रणेला दिले.
नाकाबंदीत सापडले
या पार्श्वभूमीवर आझादनगरच्या पोलिसांनी रचना हॉल चौकात नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान तीन व्यक्ती दुचाकी (एमएच १८, बीपी ६३०८)ने पारोळा चौफुलीकडून रचना हॉल चौकाकडे येणार असून, त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली.
त्यांनी सहाय्यक अधिकारी संदीप पाटील व शोधपथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईची सूचना दिली. त्या वेळी चौकात अॅक्टिव्हाने आलेल्या शेखर दत्तू वाघमोडे (वय २३), चेतन जिभाऊ पाटील (३०, दोघे रा. भोकर, ता. धुळे) आणि विकास संजय केदारे (२५, रा. पश्चिम हुडको, साईबाबा मंदिराजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) याला ताब्यात घेतले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
झडतीत एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले. त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लूटमारीचे गुन्हे
तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या चौकशीत तिघा संशयितांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार ९ ऑगस्टला नगावबारी परिसरात, १३ ऑगस्टला नगावबारी येथून चोरलेल्या दुचाकीवर जात गरताड शिवारातील तिखी फाटा, बुधवारी मोराणे शिवारात या संशयितांनी दुचाकीस्वारांना मिरचीपूड, बंदुकीच्या धाकाने लुटले होते.
यात दुचाकी, मोबाईल, रोकड, दागिने लंपास केले होते. त्यातील दोन लाख ४४ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल आझादनगर पोलिस ठाण्याने जप्त केला. पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, आझादनगरचे निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक अधिकारी संदीप पाटील, प्रकाश माळी, योगेश शिरसाट, मुक्तार मन्सुरी, गौतम सपकाळे, संदीप कढरे, योगेश शिंदे, अनिल शिंपी, अगरोद्दीन शेख, सचिन जगताप, पंकज जोंधळे, हरीश गोरे यांनी ही कारवाई केली.
संशयित मजूर व कामगार
संशयित तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वाडीभोकरचे दोघे संशयित मजुरीकाम करतात. हुडकोतील तिसरा संशयित जारच्या गाडीवर कामाला आहे. अशा कामातून त्यांना फार काही हाती लागेल असे वाटत नसल्याने कष्टाची ऐशी की तैशी म्हणत तिघांनी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला; परंतु ते पोलिसांच्या तावडीत सापडलेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.