Dhule News : येथील भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी चिंतन पटेल, तर तालुकाध्यक्षपदी किशोर माळी यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आगामी काळात त्यांच्या हाती शहराच्या राजकारणाची सूत्रे असतील हे स्पष्ट झाले आहे.(Chintan Patel as Shirpur city president of BJP dhule news )
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जिल्ह्यातील सात तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांसह आठ आघाड्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. या पदांसाठी काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रभारी स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या होत्या.
मुलाखतींचे अहवाल तपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी (ता. २) बबनराव चौधरी यांनी नियुक्ती जाहीर केली.
नवनियुक्त पदाधिकारी
धुळे (पूर्व) तालुकाध्यक्ष- देवेंद्र पाटील (कुंडाणे वेल्हाणे), धुळे (पश्चिम) तालुकाध्यक्ष- रितेश परदेशी (कुसुंबा), शिरपूर शहराध्यक्ष- चिंतन पटेल (शिरपूर), शिरपूर तालुकाध्यक्ष- किशोर माळी (वाघाडी), सांगवी (ता. शिरपूर, आदिवासी ग्रामीण) तालुकाध्यक्ष- सत्तारसिंह पावरा, (मालकातर), शिंदखेडा तालुकाध्यक्ष- दीपक बागूल (निमगूळ), दोंडाईचा शहराध्यक्ष- प्रवीण महाजन (दोंडाईचा).
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा- धरती देवरे (बोरीस), किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष- विद्याधर पाटील (खोरदड), ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष- राजेंद्र तथा आर. के. माळी (सोनगीर), आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष- जयवंत पाडवी (उमर्दा), अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष- मुबीन शेख (शिरपूर), वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष- डॉ. अतुल बडगुजर (शिरपूर), सोशल मीडिया जिल्हा संयोजक- प्रदीप कोतकर (पिंपळनेर), अभियंता प्रकोष्ठ जिल्हा संयोजक- विजय नंदन (पानखेडा).
नवनियुक्त तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व मोर्चाचे जिल्हाध्यक्षांचे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार काशीराम पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, धुळे मनपा महापौर प्रतिभा चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.