Nandurbar News : सारंगखेडा (ता. शहादा) येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची सहा दिवसांपासून नादुरुस्त झाली होती. दरम्यानच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. (Citizen expressed their anger as there was no planning for water supply by the municipal administration nandurbar news)
पालिका प्रशासनाने अथक परिश्रमाने लिकेज दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला खरा; परंतु गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास कल्पनानगर भागासह इतर वसाहतींत पाणी सोडले आणि पाणी लगेच गेले... पाणी पुन्हा येईल याच्या भरवशावर नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन झाले नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
सारंगखेडा (ता. शहादा) गावालगत असलेल्या तापी नदीपात्रातून शहादा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पंपिंगपासून काही अंतरावर शेतालगत पाणीपुरवठा जलवाहिनीला सहा दिवसांपूर्वी लिकेज झाले. पाइपाचे लिकेज मोठे असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. दोन दिवसांनंतर पालिका प्रशासनाला पाइपलाइन फुटल्याचे लक्षात आल्यावर कामाला सुरवात केली.
त्यादरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारे यंत्र बंद झाल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पाणी जास्त लागते. शिवाय मुस्लिम व दाऊदी बोहरा समाजाचे रमजान महिन्यातील रोजा सुरू आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
पालिका प्रशासनकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने पाण्याची टंचाई भासत असल्याचा नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात होता. पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामाला सुरवात झाली. शहादा पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे व पाणीपुरवठा अधिकारी आशिष महाजन यांनी आठ ते दहा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जलवाहिनी लिकेज दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते.
असा होतो पाणीपुरवठा
तापी नदीपात्रातून जलवाहिनीद्वारे येणारे पाणी भेंडव्या नाल्यालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर आल्यानंतर तिथून पाणी शहरातील ठिकठिकाणी असलेल्या सात पाण्याच्या टाक्यांमध्ये भरले जात.
दिवसासाठी ३० लाख लिटरपेक्षा जास्त पाणी तापी नदी पात्रातून उचलले जाते. शहरातील पाण्याच्या टाकीत पाच लाखांपासून ते नऊ लाख लिटर क्षमतेच्य टाक्यांमध्ये भरल्यानंतर गावातील विविध भागात पाण्याचे नियोजन केले जाते, मात्र सहा दिवसांपूर्वी अचानक जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे पाण्याचे नियोजन चुकलेले होते.
लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे शहराला पाणीपुरवठा झाला नाही. शहरातील नवीन वसाहतीत वीस वर्षांपूर्वी कूपनलिका करून पाण्याचा वापर केला जात होता. कालांतराने पालिकेच्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती.
योजना सुरू झाल्यानंतर म्हणजे एक दशकाअगोदर कूपनलिका पालिका प्रशासनकडून बुजून बंद करण्यात आल्या होत्या. कूपनलिका बंद झाल्यामुळे आता या वसाहतींमध्ये नागरिकांना पालिकेच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
"कल्पनानगरवासीयांनी पाण्यासाठी रात्र जागून काढली. पाण्याचे नियोजन करण्यात कासवगती आहे. निरंकुश सत्ता काय असते याचा अनुभव आता नागरिकांना येत आहे. आपत्कालीन परस्थितीमध्ये हक्काचा बोअर होता. हक्काचे पाणीसुद्धा हिरावून नेले. आणीबाणीच्या परिस्थितीत तो बोअर नागरिकांना कामाला आला असता. सर्वांना पाणी मिळाले असते. आमच्या पैशांनी केलेला आमचा बोअर पुन्हा शीघ्र सुरू करावा." -प्रा. दत्ता वाघ, माजी नगरसेवक, कल्पनानगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.