Dhule News : पाण्यावाचून हाल; विहिरीचे पाणी पूर्ववत करा; मोराणेतील नागरिकांची आयुक्तांकडे मागणी

महापालिका हद्दीतील मोराणे (प्र.ल.) येथील विहिरीवरील पाणीपुरवठा बंद करून हनुमान टेकडी जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात आहे.
Citizens of Morane presenting the issue of water to Municipal Commissioner and Administrator Amita Dagde-Patil.
Citizens of Morane presenting the issue of water to Municipal Commissioner and Administrator Amita Dagde-Patil.esakal
Updated on

Dhule News : महापालिका हद्दीतील मोराणे (प्र.ल.) येथील विहिरीवरील पाणीपुरवठा बंद करून हनुमान टेकडी जलकुंभावरून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी मोराणेतील नागरिकांसह जनावरांचे हाल होत आहेत.

याबाबत संताप व्यक्त करत महापालिकेतर्फे पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत विहिरीवरून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडे केली. (Citizens demanded that municipal commissioners and should restore water supply from wells until sufficient water is not made available dhule news)

मोराणे (प्र.ल.) येथे धुळे महापालिकेतर्फे गावविहिरीवरून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, काही लोकांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल करून, चुकीची माहिती पुरवून विहिरीवरून पाणीपुरवठा बंद करण्यास भाग पाडले.

सध्या महापालिकेच्या हनुमान टेकडी जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, येथून पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांसह पाळीव प्राण्यंचे पाण्यावाचून हाल होत आहेत.

त्यामुळे जोपर्यंत महापालिकेच्या जलवाहिनीतून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत गावविहिरीवरून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा.

Citizens of Morane presenting the issue of water to Municipal Commissioner and Administrator Amita Dagde-Patil.
Dhule Polio Vaccination : बालकांना ३ मार्चला देणार पोलिओ लस : जिल्हाधिकारी गोयल

तसेच हनुमान टेकडीवरून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम गुणवत्तापूर्वक करून घ्यावे, अशी मागणी मोराणे येथील नागरिकांनी केली.

मागण्यांची दखल न घेतल्यास महापालिकेवर मोर्चा आणू, पाणीपट्टी भरण्यास विरोध करू, असा इशाराही तक्रारकर्त्यांनी निवेदनातून महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांना दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हृषीकेश ठाकरे, नवनाथ पवार, बापू खैरनार, सागर पाटील, विलास पारधी, किरण पारधी, अमोल चव्हाण, रोहित बोरसे, आकाश पारधी, विनोद क्षीरसागर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

Citizens of Morane presenting the issue of water to Municipal Commissioner and Administrator Amita Dagde-Patil.
Dhule News : धुळ्यात ‘हिस्ट्रिशीटर्स’ची आज हजेरी : पोलिस अधीक्षक धिवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()