Nandurbar Rain Update : पावसामुळे अर्थचक्र गतिमान होणार; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास

Nandurbar Rain Update : पावसामुळे अर्थचक्र गतिमान होणार; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास
Updated on

Nandurbar Rain Update : तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २९) पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या पावसामुळे शेतकऱ्यांना आता पावसाअभावी खोळंबलेली पिकांची लागवडीची कामे पूर्ण करता येणार आहेत. मात्र पहिल्याच पावसात तळोदा शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. (Citizens suffer due to water accumulation on roads due to rain nandurbar news)

जून महिना संपत आला तरी पावसाने तळोदा तालुक्यावर अवकृपा दाखवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली होती. मात्र पावसाअभावी बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी वर्ग पुढे येत नव्हता. त्यामुळे तळोदा तालुक्यातील बळीराजा पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत होता.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २९) सकाळी सहापासून पावसाला सुरवात झाली. तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाळ्यात पहिल्याच पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा व सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. पावसामुळे आता शेतकऱ्यांना पावसाअभावी रखडलेली पिकांची लागवडीची कामे करता येणार आहेत.

शहरात ठिकठिकाणी पाणी साचले

तळोदा शहरात गुरुवारी पावसाने दिवसभर बॅटिंग केल्याने शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. शहरातील मेन रोड, जुनी नगरपालिका परिसर, कॉलेज रोड, मेघराज कॉलनी, वन विभाग कार्यालय तसेच अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित सोय नसल्याने, ठिकठिकाणी पाण्याचे तयार झालेले तलाव दिसून आले. काही ठिकाणी तर अक्षरशः गुडघ्याइतके पाणी साचले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar Rain Update : पावसामुळे अर्थचक्र गतिमान होणार; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास
Rain Update : जूनमध्ये ४९ टक्के पाऊस; राज्यात धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ५.४४ टक्के कमी जलसाठा

शेतकऱ्यांमध्ये समाधान

जून महिना संपत आला तरी तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या होत्या. पाऊस लांबल्यास त्याचा विपरित परिणाम विविध पिकांचा लागवडीवर होणार होता.

पावसाने जास्त ओढ दिली असती तर पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्यता होती तसेच शेतकऱ्यांनी पेरणी केली असती आणि त्यानंतर पाऊस लांबला असता तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असती. मात्र या चांगल्या पावसामुळे सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अतिक्रमणामुळे परिस्थिती

तळोदा पालिकेच्या माध्यमातून पावसाळा पूर्वीची गटार व नालेसफाई करण्यात आली होती. तरीदेखील गुरुवारी झालेल्या पावसात अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळेच ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे बोलले जात आहे.

Nandurbar Rain Update : पावसामुळे अर्थचक्र गतिमान होणार; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास
Dhule Rain : पहिल्याच पावसात पिंपळनेरमधील रस्त्यांची चाळण

त्याला असंख्य नागरिकांनी गटारींवर केलेले अतिक्रमण जबाबदार असल्याचे सांगितले जाते. अतिक्रमणामुळे नालेसफाई करताना अनेक अडचणी येत असतात आणि त्यामुळे पावसाळ्यात वर्षानुवर्षांपासून नागरिकांना याच समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला

तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ दडी मारलेल्या पावसाने आषाढी एकादशीच्या पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाअभावी पूर्वहंगामी कपाशीची वाढ खुंटली होती, मात्र गुरुवारी झालेल्या संततधारेमुळे कापूस पिकाची वाढ जोमात होणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची कपाशी लागवडीसाठी धडपड सुरू आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यात पेहरणीस वेग येणार आहे.Œ

Nandurbar Rain Update : पावसामुळे अर्थचक्र गतिमान होणार; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास
Rain Alert: पुढील तीन दिवस अतिमुसळधार; सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.