Dhule Crime News: कत्तलीच्या इराद्याने उंटाची वाहतूक; शिरपूर पोलिसांची कारवाई

शहादा रस्त्यावरून तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती शिरपूर पोलिस दलाली मिळाली होती.
Police inspector Ansaram Agarkar, neighbors Hemant Khairnar, Dnyaneshwar Marathe, Dinesh Eshi etc. took action on the suspicion of taking camels for slaughter.
Police inspector Ansaram Agarkar, neighbors Hemant Khairnar, Dnyaneshwar Marathe, Dinesh Eshi etc. took action on the suspicion of taking camels for slaughter.
Updated on

Dhule Crime News : गुजरात मधील कच्छ येथून महाराष्ट्रातील गोंदियाकडे ९ लाख ८० हजाराची ४९ उंट अवैधरीत्या पायी घेऊन जाणाऱ्या दोघांना उंटासह तालुक्यातील विखरणजवळ शिरपूर-शहादा रस्त्यावर शहर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.

याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांकडून उंट ताब्यात घेण्याची ही पहिलीच कारवाई तालुक्यात करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सर्व उंटाची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. (city police detained two along with camel in dhule news)

शहादा रस्त्यावरून तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती शिरपूर पोलिस दलाली मिळाली होती. या माहितीवरून विखरणजवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक ठाण मांडून बसले होते.

गुरुवारी (ता.२८) दुपारी एकला संशयित हे उंट गोंदियाकडे घेवून जात असताना गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे उंटांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी संशयित भोजाभाई कान्हभाई रबारी (वय २२ रा.कुकडसर भद्रेश्वर, कच्छ) आणि भाराभाई मंगुभाई रबारी (वय ६० रा. झाडवा जि. भुज, गुजरात) या दोघांना ताब्यात घेतले.

Police inspector Ansaram Agarkar, neighbors Hemant Khairnar, Dnyaneshwar Marathe, Dinesh Eshi etc. took action on the suspicion of taking camels for slaughter.
Dhule Crime News : पिकअप मधून गायींची वाहतूक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत संशयित एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही तालुक्यातील पहिलीच कारवाई आहे. पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, सुरेश सोनवणे, पोलिस हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, आरिफ तडवी, दादाभाई बोरसे, विनोद आखडमल, भटू साळुंखे, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, मनोज महाजन, सचिन वाघ, चालक रवींद्र महाले, विजय पाटील आदींच्या पथकाने केली.

उंटांची वैद्यकीय तपासणी

दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप भाकरे, प्रकाश पाटील यांनी उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. त्यानंतर सदर उंट वरुळ येथील संत तुकाराम महाराज गोशाळेत देखभालीसाठी रवाना करण्यात आले.

Police inspector Ansaram Agarkar, neighbors Hemant Khairnar, Dnyaneshwar Marathe, Dinesh Eshi etc. took action on the suspicion of taking camels for slaughter.
Dhule Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे हडपली महिलेची जमिन; 5 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.